मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /वाढदिवशी समोर आली गडकरींची 'ती' खास इच्छा; म्हणाले मी गेल्या अनेक दिवसांपासून स्वप्न...

वाढदिवशी समोर आली गडकरींची 'ती' खास इच्छा; म्हणाले मी गेल्या अनेक दिवसांपासून स्वप्न...

नितीन गडकरींच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन

नितीन गडकरींच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन

आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा वाढदिवस आहे. गडकरींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते नागपुरात पोहोचले आहेत.

नागपूर, 28 मे, उदय तिमांडे : आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा वाढदिवस आहे. गडकरींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते नागपुरात पोहोचले आहेत. गडकरींच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध ठिकाणी रोगनिदान शिबिरांचं आयोजन देखील करण्यात आलं आहे. नितीन गडकरी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे.

नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी? 

राजकारण हे समाजकारण आहे, त्यामुळे समाजाची सेवा करायला हवी. आज डोळे तपासणारी व्हॅन आणि कमी खर्चात चश्मा देणाऱ्या सेवेचा शुभारंभ झाला. वाढदिवसानिमित्त जनतेच्या शुभेच्छा येत आहे, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आज गरजुंना आरोग्यविषयक साहित्य वाटप करण्यात आलं. आईच्या स्मरनार्थ कमी खर्चात एमआरआय मशिन देणार आहे. माझं एक स्वप्न आहे. ते म्हणजे दरवर्षी देशामध्ये 16 लाख कोटीचं ईंधन आयात होतं. ते कमी होऊन पर्यायी इंधनावर भर देण्यात यावा, यामुळे शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होऊ शकतो असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान नितीन गडकरी यांना वाढदिवसानिमित्त विविध भेटवस्तू देण्यात येत आहेत. यामध्ये क्रिकेटची बॅट, स्टम्प आणि हॉकी स्टिकचा हार घालून गडकरींचा सत्कार करण्यात आला आहे. नितीन गडकरी यांनी नागपूरमधील 350 मैदानं खेळण्यायोग बनवली आहेत. त्यांचं हे योगदान लक्षात घेता  खेळाडूंकडून त्यांना या अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Nagpur, Nitin gadkari