मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /संपूर्ण देशात रस्ते बांधणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना घरासमोर 2 किमीचा रस्ता बांधता येईना, पाहा नेमकं काय म्हणाले गडकरी

संपूर्ण देशात रस्ते बांधणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना घरासमोर 2 किमीचा रस्ता बांधता येईना, पाहा नेमकं काय म्हणाले गडकरी

"देशात रस्ते बांधले, पण घरासमोरील 2 किमीचा रस्ता बांधू शकलो नाही" नितीन गडकरींनी सांगितला किस्सा

"देशात रस्ते बांधले, पण घरासमोरील 2 किमीचा रस्ता बांधू शकलो नाही" नितीन गडकरींनी सांगितला किस्सा

Nitin Gadkari unable to built 2 km road in front of his house in nagpur: नागपुरात स्वत:च्या घरासमोरील दोन किलोमीटरचा रस्ता बांधू शकलो नाही अशी खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.

नागपूर, 19 फेब्रुवारी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी संपूर्ण देशभरात रस्त्यांची निर्मिती करत एक जाळं विणलं. त्यांच्या कामासोबतच दिलखुलास स्वभावासाठीही ते ओळखले जातात. शुक्रवारी (18 फेब्रुवारी 2022) नागपुरात (Nagpur) आयोजित एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी भाषण करताना अगदी दिलखुलासपणे भाष्य केलं आहे. आपण देशभरात रस्ते बांधले पण आपल्या स्वत:च्या घरासमोर दोन किलोमीटरचा रस्ता बांधू शकलो नाही अशी खंत स्वत: नितीन गडकरींनी बोलून दाखवली. (Nitin Gadkari said I Can not built 2 km road in front of my house in Nagpur)

नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी?

नितीन गडकरी म्हणाले, मी 6 वर्षे झाली महालात गेलो नाही, बाहेर राहतो आणि तो रोड करता-करता अजूनपर्यंत किती अर्ज घेऊन कोर्टात जातात. किती कोर्टाचे न्यायमूर्ती त्याला स्टे देतात. माझ्या घरासमोरचा मुधोजीराजे दोन किलोमीटरचा रोड करता करता पार थकलो. पण अजून हा रोड तयार झाला नाही.

दिल्ली एक्सप्रेस वे हा एक लाख कोटी रुपयांचा रस्ता दोन वर्षांत झाला पण हा दोन किलोमीटरचा रस्ता करता करता थकलो असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

पुढची मेट्रो लोकांच्या पैशाची नाही

नितीन गडकरी पुढे म्हणाले, नागपूर मेट्रो भारतातील सर्वोत्कृष्ट मेट्रो आहे. नागपूर मेट्रोचं डिझाईन चांगलं आहे. भांडवली खर्च कमी आहे. इतर मेट्रो प्रति किमी 350 कोटीच्या भांडवली खर्चातून बांधलेली आहे. मात्र, आपली मेट्रो 200 कोटी प्रति किमी खर्चाने बांधलेली आहे. पुढची मेट्रो लोकांच्या पैशांची बनवायची नाही.

वाचा : औरंगाबादेत शिवसेना आमदाराकडून भावजयीस बेदम मारहाण, धक्कादायक कारण आलं समोर

सरकारमध्ये आम्ही असलो तर आम्हाला काहीही बोलायला मुभा असते. कारण आम्हाला कोणी काही विचारु शकत नाही की काय बोलतायत. सरकारमध्ये चांगले काम करणाऱ्यांचा सत्कार होत नाही व वाईट काम करणाऱ्यांना शिक्षा मिळत नाही असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं.

चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला प्रोत्साहन दिलं तर त्याचं मोटिवेशन आणखी वाढतं. मी एकदा गाडीतून जात असताना मेट्रोच्या खालील झाडे वाढलेली दिसली. कुठे वाळलेलं झाडं मला दिसलं तर मी पीडब्ल्यूडी असो किंवा आणखी कुणी त्याला तात्काळ विचारतो. आपलं नागपूर, आपला रस्ता असा जिव्हाळा असायला हवा. त्याची कमी आहे असंही नितीन गडकरी म्हणाले.

First published:
top videos

    Tags: Nagpur, Nitin gadkari