नागपूर, 28 मार्च : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा गडकरींनी केलेल्या विधानाची चर्चा सुरू आहे. गडकरींनी म्हटलं की, गडकरी नाव कुठे, जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर मला मत द्या, नाहीतर नका देऊ. आता जास्त लोणी लावायला मी तयार नाही. तुम्हाला योग्य वाटलं तर ठीक, नाहीतर कोणी नवं येईल. गडकरींच्या या वक्तव्यामुळे पुन्हा राजकारण रंगलं आले.
विकास कामांशिवाय गडकरींच्या वक्तव्यांची चर्चाही नेहमी होत असते. आता नागपूरमधील एका खासगी संस्थेच्या कार्यक्रमात त्यांनी बेधडक वक्तव्य केलं. तुम्हाला योग्य वाटलं तर मला मत द्या, नाहीतर नका देऊ. मी आता जास्त लोणी लावायला तयार नाही. तुम्हाला वाटलं तर ठीक, नाहीतर कोणीतरी नवा येईल असं गडकरी म्हणाले.
नागपुर ते नांदेड अंतर तीन तासात गाठता येणार, केंद्रीय मंत्री गडकरींची घोषणा
नागपूरमध्ये वेस्टलँड, वेस्ट वॉटरशी संबंधित काम करणाऱ्या संस्थेकडून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा नितीन गडकरी यांनी म्हटलं की, वेस्टलँडवर होणारे अनेक प्रयोग आहेत. मी हे काम जिद्दीने करतो, प्रेमाणे करतो. पुन्हा कठोरपणेही करतो. मी लोकांना सांगितलंय की आता खूप झालं. मी निवडून आलोय. जर बरोबर वाटत असेल तर मला मत द्या. खरं सांगायचं तर मला वेस्टलँड आणि वेस्टवॉटरवर काम करण्यासाठी वेळ द्यायचा आहे. या कामामुळे भविष्य चांगलं होईल असं मला वाटतं.
नितीन गडकरींची अशी वक्तव्ये काही नवी नाहीत. त्यांनी याआधीही केलेल्या अशा वक्तव्यांची नेहमी चर्चा झाली. पण जेव्हा गडकरी असे बोलतात त्यावेळी राजकीय विश्लेषकांकडून वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जातात. नितीन गडकरी नाराज आहेत किंवा पक्ष गडकरींबाबत कठोर आहे वगैरे चर्चा सुरू होतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nagpur, Nitin gadkari