मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nagpur : सर्वसामान्यांना नडणाऱ्या दलालांना चाप, फक्त 7 दिवसांमध्ये होणार महत्त्वाची कामं

Nagpur : सर्वसामान्यांना नडणाऱ्या दलालांना चाप, फक्त 7 दिवसांमध्ये होणार महत्त्वाची कामं

शासकीय कार्यालयीन कामकाज जलद गतीने करण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासकडून पाऊले उचलण्यात आले आहेत.

शासकीय कार्यालयीन कामकाज जलद गतीने करण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासकडून पाऊले उचलण्यात आले आहेत.

शासकीय कार्यालयीन कामकाज जलद गतीने करण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासकडून पाऊले उचलण्यात आले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 18 नोव्हेंबर : कुठलेही शासकीय कार्यालयीन कामकाज म्हणजे वेळखाऊ प्रक्रिया असते. या टेबल वरून दुसऱ्या टेबलकडे चकरा मारल्या शिवाय काम होत नाही, असा समज सर्वसामान्यांचा असतो. मात्र, या समजुतीला छेद देऊन शासकीय कार्यालयीन कामकाज जलद गतीने करण्यासाठी नागपूर  सुधार प्रन्यासकडून पाऊल उचलण्यात आले आहे. भाडेतत्त्वावर वाटप केलेले भूखंड धारक, सदनिका धारक, भूखंड, दुकानाचे पट्टे यांचे नूतनीकरण व पंजीयन आता 7 दिवसात होणार आहे. 

पूर्वी अशी होती किचकट व वेळखाऊ प्रक्रिया

नागरिकांनी सादर केलेल्या पट्टा पंजीयन व पट्टा नूतनीकरणाच्या अर्जावर कारवाई होण्यास व पट्टा पंजीयन करण्यास वेळ लागल्याने नागरिकांचा रोष निर्माण होत होता. सदर बाब टाळण्याच्या दृष्टीने नासुप्रने नवीन कार्यपद्धतीचा अवलंब केला आहे. आजघडीला नासुप्रचे सुमारे 10 लाख लीजधारक आहेत. पंजीयन व नूतनीकरणासाठी अर्ज केल्यानंतर चलन प्राप्त होत होते. त्यानंतर लीज ड्राफ्टसाठी नासुप्रच्या कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या. तसेच कोर्ड एजेंट पुढची तारीख देत होते. या प्रक्रियेत नागरिकांचे महिने जात होते. 

यापुढे नागपूर सुधार प्रन्यास कार्यालयात ज्या नागरिकांना आपला भूखंड, सदनिका, दुकानाचे पट्टे पंजीयन व नूतनीकरण करावयाचे आहे त्यांनी अर्जासह आवश्यक शुल्कांचा भरणा करून व दस्तावेजनसह अर्ज सादर करावा. अर्ज सादर केल्यानंतर संबंधित भूखंड ,सदनिका, दुकान धारकांना दस्त प्राप्त करण्यासाठी नासुप्रच्या पट्टा पंजीयन  विभागाकडून सुट्टीचा दिवस वगळता पाच दिवसात दस्त देण्यात येईल. दस्त प्राप्त केल्यानंतर ज्या दिवशी अर्जदार दस्त प्रमाणे रकमेचा भरणा केल्याची प्रत पट्टा पंजीयन विभागात सादर करेल त्याच्या दुसऱ्या दिवशी कोणत्या दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त लावण्यात येणार आहे याबाबत लेखी पत्र देण्यात येईल व त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्जदाराला पट्टा पंजीयन व नूतनीकरण करून देण्यात येईल. अर्ज केल्यानंतर 2400 रुपये शुल्क भरून पाचव्या दिवशीच ड्राफ्ट मिळेल. दुय्यम निबंधक कार्यालयात मुद्रांक भरले तर दुसऱ्या दिवशीच नूतनीकरण होईल, असे नासुप्रचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले.

नव्या कार्यप्रणालीमुळे दलालांना बसेल चाप

पूर्वी होत असलेल्या वेळखाऊ प्रक्रियेमुळे दलालांचा मोठ्याप्रमाणावर हस्तक्षेप झाला होता. रीतसर काम करून घेण्यापेक्षा थोडे ज्यादा पैसे मोजून दलालांकडून काम करून घेणे अधिक सोयीचे असल्याची धारणा नागरिकांची झाली होती. मात्र आता नव्या प्रक्रियेनुसार कार्यपद्धती अधिक सुलभ झाल्याने नागरिकांची या त्रासातून मुक्तता होणार आहे. 

शहराचं सौंदर्य वाढवणाऱ्याला पालिका देणार बक्षीस, तुम्हालाही मिळू शकते संधी!

ऑनलाइन भाग नकाशा

भाग नकाशा हा जमिनीच्या व्यवहारासाठी महत्त्वाचा भाग असतो. एनएमआरडीएकडे 1000 रुपये शुल्क भरून तो नकाशा काढण्यात येत होता. भाग नकाशासाठी दिवसाला 50 पेक्षा जास्त अर्ज प्राप्त होतात. सदर बाब लक्ष्यात घेता नागरिकांची ही पायपीट थांबावी, यासाठी आता एका क्लिक वर भाग नकाशा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठीचे काम एनएमआरडीएने हाती घेतले असून ऑनलाइन भाग नकाशा काढण्यासाठी कुठलेही शुल्क भरावे लागणार नाही, लवकरच https:// www.nitnagpur.org/index.aspx या नासुप्रच्या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध होणार आहे असे नासुप्रकडून सांगण्यात आले आहे.

First published:

Tags: Local18, Nagpur