मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /काँग्रेसनंतर राष्ट्रवादीकडूनही बंडखोर उमेदवारावर निलंबनाची कारवाई; नागपुरात चौरंगी लढत

काँग्रेसनंतर राष्ट्रवादीकडूनही बंडखोर उमेदवारावर निलंबनाची कारवाई; नागपुरात चौरंगी लढत

शरद पवार

शरद पवार

काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही पक्षादेश न मानल्याने आपला अपक्ष उमेदवारावर निलंबनाची कारवाई केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 16 जानेवारी : नाशिक पदवीधर निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पक्षाचा एबी फॉर्म पाठवूनही आमदार सुधीर तांबे यांनी अर्ज न भरल्याने काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई केली होती. आता अशीच कारवाई राष्ट्रवादी काँग्रेसने देखील केली आहे. नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश इटकेलवार यांचे पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागपूर शहराध्यक्ष दूनेश्वर पेठे यांनी ही माहिती दिली आहे.

पक्षादेश न मानल्याने कारवाई  : दूनेश्वर पेठे

सुधीर तांबे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आपले अपक्ष उमेदवार सतीश इटकेलवार यांच्यावर कारवाई केली आहे. इटकेलवार यांनी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीत अर्ज दाखल केला होता. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. पक्षाने सांगूनही उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. सतीश इटकेलवार सकाळपासून नॉट रीचेबल होते. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष दूनेश्वर पेठे यांनी व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे.

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीत लढत कशी असेल?

शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे गंगाधर नाकाडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तर राष्ट्रवादीचे सतीश इटकेलवर यांचा उमेदवारी अर्ज कायम आहे. आता मुख्य लढत भाजप समर्थन महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे नागो गाणार, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर आडबाले, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे आणि राष्ट्रवादीचे बंडखोर सतीश इटकेलवार हे निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. एकूण 5 उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नामांकन अर्ज मागे घेतला. ते पुढीलप्रमाणे आहेत. नीलकंठ उईके, अतुल रुईकर, मुकेश पुडके, गंगाधर नाकाडे, मृत्युंजय सिंग.

काँग्रेसच्या शिस्तभंग समितीकडून सुधीर तांबे यांचं निलंबन

उमेदवारी आणि एबी फॉर्म देऊनही अर्ज दाखल न करणाऱ्या सुधीर तांबे यांच्यावर काँग्रेस पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे. चौकशी होईपर्यंत सुधीर तांबे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. काँग्रेसच्या शिस्तभंग समितीकडून सुधीर तांबे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. दरम्यान सत्यजीत तांबे यांच्याबाबत अजूनतरी पक्षाने कोणताही निर्णय घेतला नाही, पण नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.

First published:

Tags: Nagpur, Sharad Pawar