मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जागा वाटपाबाबत पटोलेंचं मोठं वक्तव्य; ठाकरे गटाच्या दाव्यातील हवाच काढली

जागा वाटपाबाबत पटोलेंचं मोठं वक्तव्य; ठाकरे गटाच्या दाव्यातील हवाच काढली

नाना पटोलेंची जागा वाटपावर प्रतिक्रिया

नाना पटोलेंची जागा वाटपावर प्रतिक्रिया

ठाकरे गटाकडून लोकसभेच्या 18 जागांवर दावा करण्यात आला आहे. यावर आता नाना पटोले यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे.

नागपूर, 23 मे :  काँग्रेसच्या कोर ग्रुपची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. या बैठकीनंतर दोन आणि तीन जूनला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना बोलवून जिल्हानिहाय बैठक होणार असल्याचंही यावेळी नाना पटोले यांनी म्हटलं आहे. दरम्यान जागा वाटपावर बोलताना जागा या मेरिटच्या आधारावरच वाटप होणार असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.  मात्र दुसरीकडे सुरुवातील ठाकरे गटाकडून वीस जागांवर दावा करण्यात आला होता, अजूनही ठाकरे गट 18 जागांवर ठाम आहे.

आमचे महाराष्ट्रातून 18 तर दादरा नगर हवेलीमधून एक असे एकूण 19 खासदार लोकसभेत जातील असं वक्तव्य वारंवार संजय राऊत यांच्याकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांकडून समान जागा वाटपाचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यावर बोलताना नाना पटोले यांनी म्हटलं की,  2014 आणि 2019 मध्ये परिस्थिती वेगळी होती. आता मेरिटच्या आधारावर निर्णय होईल, कोणाला किती जास्त जागा मिळतात हे महत्त्वाचं नाही, तर कोणाच्या किती जागा विजयी होतात याला महत्त्व आहे. पटोले यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

पुढे बोलताना नाना पटोले यांनी म्हटलं की, जागा वाटपाची चर्चा ही महाविकास आघाडीमध्ये व्हावी यावर आमचा भर आहे. विजयाच्या आधावर जागा वाटप ठरवलं जाईल. कोणाची ताकत कमी झाली यावर चर्चा होणार नाही. मात्र मेरिटच्या आधारावर जागा वाटप होईल, या सगळ्या विषयांवर एकत्रित चर्चा होईल.

First published:
top videos

    Tags: Congress, Nana Patole, NCP, Sharad Pawar, Shiv sena, Uddhav Thackeray