मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भाजप विरोधात पवारांच्या नेतृत्वाची चर्चा म्हणजे मिठाचा खडा टाकणारा प्रकार : नाना पटोले

भाजप विरोधात पवारांच्या नेतृत्वाची चर्चा म्हणजे मिठाचा खडा टाकणारा प्रकार : नाना पटोले

आगमी लोकसभा निवडणुकीत भाजपचा सामना करण्यासाठी देशभरातील काही प्रादेशिक पक्ष एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे विरोधकांची मोट बांधण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी गेल्या आठवड्यात मुंबईत येऊन गेल्या.

पुढे वाचा ...

नागपूर, 13 डिसेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देशाचं नेतृत्व करावं. त्यांनी पंतप्रधानपदी विराजमान व्हावं, असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. याच संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर पटोले यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.

नाना पटोले नेमकं काय म्हणाले?

"शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी याआधीच आपली युपीए संदर्भातली भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेस शिवाय यूपीएचा विचार होऊ शकत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे पवारांच्या नेतृत्वाला एकमत झाल्याची चर्चा म्हणजे मध्येच मिठाचा खडा टाकणारा प्रकार आहे", अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

शरद पवारांची भाजप विरोधी आघाडीवर नेमकी भूमिका काय?

आगमी लोकसभा निवडणुकीत भाजपचा सामना करण्यासाठी देशभरातील काही प्रादेशिक पक्ष एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे विरोधकांची मोट बांधण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी गेल्या आठवड्यात मुंबईत येऊन गेल्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत, आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती. पवारांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यामुळे देशात मोदी सरकारविरोधात तिसरी आघाडी निर्माण होणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता. या प्रश्नाचं शरद पवार यांनी त्याचवेळी उत्तर दिलं होतं. काँग्रेसला सोबत घेऊनच सर्व केलं जाईल, असं पवारांनी स्पष्ट केलं होतं.

हेही वाचा : श्रीनगरमध्ये पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला, 14 जण जखमी

'ओबीसींचं राजकीय आरक्षण कायम ठेवूनच निवडणुका व्हाव्या'

दरम्यान, नाना पटोले यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही प्रतिक्रिया दिली. "उद्या सर्वोच्च ओबीसी आरक्षण संदर्भातली सुनावणी आहे. खरंतर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्याचा निवडणुका लागलेल्या आहेत. मात्र काँग्रेस पक्षाचे स्पष्ट मत आहे की, जोपर्यंत ओबीसींचा राजकीय आरक्षण बहाल होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारच्या वतीने हीच भूमिका मांडली जाणार आहे. आम्हाला अपेक्षित आहे की ओबीसींचं राजकीय आरक्षण कायम ठेवूनच या निवडणुका व्हाव्या. तसेच या विषयावर मुख्यमंत्र्यांसोबत बोलणं झालंय. राज्य सरकारने उद्याच्या सुनावणीसाठी चांगले वकील नेमलेले आहेत. राज्य सरकारची ओबीसींच्या राजकीय आरक्षण कायम राहावा यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे", अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

"अनेक ठिकाणी ओबीसी समाजाने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सरसकट रद्द करण्यात यावा, अशी काँग्रेसची भूमिका आहे. तसेच राज्य मागासवर्ग आयोगाला कमी निधी दिला असला. तरी गरजेप्रमाणे टप्प्याटप्प्याने निधी देता येईल. संपूर्ण निधी एकदाच दिला म्हणजे सर्व डेटा गोळा होईल असा त्याचा अर्थ होत नाही", अशी भूमिका पटोले यांनी मांडली.

First published:

Tags: Nagpur News