मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ऊर्जामंत्र्यांसमोर भर बैठकीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचं बंड, वीजबिलांच्या वसुलीवरुन संतापल्या

ऊर्जामंत्र्यांसमोर भर बैठकीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचं बंड, वीजबिलांच्या वसुलीवरुन संतापल्या

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा भर बैठकीत ऊर्जा मंत्र्यांवर संताप

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा भर बैठकीत ऊर्जा मंत्र्यांवर संताप

नागपूर जिल्हा परिषदेच्या 1532 शाळा (Nagpur ZP schools) आहेत. त्यापैकी वीजबिल न भरल्याने 200 पेक्षा जास्त शाळांची वीज कापण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षांनी आपला संताप थेट ऊर्जामंत्र्यांवर काढून त्यांना अडचणीत आणले.

नागपूर, 30 डिसेंबर : नागपूर जिल्हा परिषदेच्या 1532 शाळा (Nagpur ZP schools) आहेत. त्यापैकी वीजबिल न भरल्याने 200 पेक्षा जास्त शाळांची वीज कापण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षांनी आपला संताप थेट ऊर्जामंत्र्यांवर काढून त्यांना अडचणीत आणले. "ऊर्जा विभाग (energy department) जिल्हा परिषदेच्या शाळांकडून (ZP schools) व्याजासकट वीजबिल वसूल करते. वीजबिल न भरल्यास शाळांची वीज कापते. तर मग ऊर्जा विभागानेदेखील नागपूर जिल्हा परिषद (Nagpur ZP) हद्दीत असलेल्या महावितरणाच्या (MSEB) विजेच्या खांबांचे भाडे जिल्हा परिषदेला द्यावे", अशी मागणी नागपूरच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांनी थेट ऊर्जामंत्री नितीन राऊत (Minister Nitin Raut) यांच्यासमोर नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. जिल्हा परिषदच्या अध्यक्षांची मागणी बघून ऊर्जामंत्री नितीन राऊत देखील भर बैठकीत चक्रावून गेले आणि अशी मागणी बैठकीत करणे योग्य नाही, अशा शब्दांत त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांना खडसावलं.

जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे नेमकं काय म्हणाल्या?

"जिल्हा परिषद अंतर्गत असणारा निधी आम्हाला वाढवून द्यावा. विद्यूतचे बिल ग्रामपंचायतला खूप मोठ्या प्रमाणात भरावे लागत आहेत. महावितरण विद्यूत बिल व्याजासकट घेत आहे. आम्हाला टप्प्याटप्प्याने बिलाची मुद्दल भरण्यासाठी वेळ द्यावा. महावितरणाचे पोल ग्रामीण भागात बसवलेले आहेत. गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून ते पोल बसविण्यात आले आहेत. त्याचा टॅक्स देण्यात यावा. जेणेकरुन ग्रामीण विभागाची यामुळे आर्थिक व्यवस्था सुधारण्यास मदत होईल", अशी भूमिका जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी मांडली.

हेही वाचा : 'पवार-ठाकरेंनी राहुल गांधींचं पपलू केलं', विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन किरीट सोमय्यांचा निशाणा

नितीन राऊत यांची प्रतिक्रिया

रश्मी बर्वे यांच्या भूमिकेवर नितीन राऊत यांनी लगेच प्रतिक्रिया दिली. "असं या ठिकाणी मांडायचं नसतं. शेवटी आपण राज्य शासन आहोत. राज्य शासनाचे जे काही विषय असतात ते या पद्धतीने घ्यावे लागतात. तुम्हाला सगळी माहिती पुरविण्यात येईल. मी मंत्री महोदयाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. तुम्ही काळजी करु नका. शेवटी हा प्रारुप आहे. या प्रारुपमध्ये ज्या सूचना येतील त्या आपण विचारात घ्याव्यात. जितकं शक्य असेल तेवढं करुयात", असं नितीन राऊत म्हणाले.

First published: