Home /News /maharashtra /

नागपूर : पतीच्या मृत्यूनंतर विधवेने 2 मुलींसह हिंदू धर्माचा केला त्याग; मुस्लीम धर्म का स्वीकारला? 

नागपूर : पतीच्या मृत्यूनंतर विधवेने 2 मुलींसह हिंदू धर्माचा केला त्याग; मुस्लीम धर्म का स्वीकारला? 

आता मात्र महिलेला कुटुंबीयांकडून मनस्ताप दिला जात आहे.

    नागपुर, 24 जुलै : एका महिन्यापूर्वी नागपूरमध्ये राहणारी एक महिला आणि तिच्या दोन मुलींनी हिंदू धर्माचा त्याग करीत इस्लाम धर्म कबुल केला. सुरुवातीला तिच्या नातेवाईकांना याबाबत माहिती नव्हती. शेवटी तिघींनीही धर्मपरिवर्तन केल्याचं कबुल केलं. आता मात्र महिलेला आणि तिच्या मुलींना लोकांचा त्रास सहन करावा लागत आहे. संविधानाने प्रत्येक व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार धर्माचं पालन करण्याचा अधिकार दिला आहे. जबरदस्तीशिवाय जर एखादी व्यक्ती कोणा धर्माचा स्वीकार करीत असेल तर तिला संविधानानुसार तो अधिकार आहे. गेल्या अनेक दिवसात कम्प्तीमध्ये धर्मावरुन वाद सुरू होता. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ एक समुदायावर निशाणा करणारी आक्षेपार्ह पोस्ट समोर आली होती. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पतीच्या मृत्यूनंतर कुटुंबाला धक्का... कम्प्तीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या पतीला पॅरालेसिस झाला होता आणि काही वर्षांपूर्वी त्याचं निधन झालं. यानंतर कुटुंबीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. यानंतर समोरील एका मुस्लीम दुकानदाराकडून त्यांना मदत मिळत होती. तरुणाने या कुटुंबाला आपल्या दुकानाजवळ राहायला जागा दिली. मुस्लीम तरुण मुलाप्रमाणे... जेव्हा महिला आणि तिच्या मुलींना इस्लाम स्वीकारण्याचा निर्णय घेतला तर गोंधळ उडाला. यासाठी सर्वजण मदत करणाऱ्या त्या तरुणाला दोषी ठरवत होते. तरुण म्हणाला की, आमच्यामध्ये कौटुंबिक संबंध आहेत. त्याचा इस्लामशी काहीही संबंध नाही. जर एखाद्या व्यक्तीला इस्लाम प्रती आत्मीयता नसेल तोपर्यंत धर्म अशा प्रकारच्या धर्मांतरणाचा स्वीकार करीत नाही. तरुणाने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आपल्याच समुदायात लग्न केलं होतं. मी त्या महिलेला आपल्या आईसमान वागवतो आणि त्यांच्या मुलींना माझ्या बहिणींप्रमाणे. मी त्यांना धर्मांतरण करण्यास सांगितलं नाही. दुकानाच्या मालकाने सांगितलं की, या सर्व प्रकारानंतर विधवाचे नातेवाईक तिच्यावर दबाव टाकत आहेत. आणि पुन्हा हिंदू धर्मात परतण्यासाठी दबाव टाकत आहे. इतकच नाही तर त्यांना घर रिकामी करण्यासाठीही जबरदस्ती करीत आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Muslim, Nagpur News

    पुढील बातम्या