मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नागपूर स्टॅम्प घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी याचिका दाखल!

नागपूर स्टॅम्प घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी याचिका दाखल!

नागपूर येथील स्टॅम्प घोटाळा प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आली आहे.

नागपूर येथील स्टॅम्प घोटाळा प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आली आहे.

नागपूर येथील स्टॅम्प घोटाळा प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 29 नोव्हेंबर : नागपूर येथील स्टॅम्प घोटाळा प्रकरणात त्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. जमीन मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी सतीश उके यांचे वकील रवी जाधव यांनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. हा अर्ज न्यायाधीश एमजी देशपांडे यांनी स्वीकारला आहे. सतीश उके काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील आहेत. जमीन घोटाळा प्रकरणात सतीश उके यांना ईडीने अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

कोण आहे सतीश उके?

नागपुरातील वकील सतीश उके आणि त्यांच्या भावाने बनावट जमिनीची कागदपत्रे बनवून शहरातील जमीन हडप केल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने केला आहे. ईडीने 31 मार्च 2022 रोजी दोन्ही आरोपींना मनी लाँड्रिंग विरोधी कायद्यांतर्गत अटक केली होती.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अनेक वर्षांपासून याचिका दाखल करण्यासाठी हे वकील ओळखले जातात. 31 मार्च 2022 रोजी नागपूरच्या पार्वतीनगर भागातील वकिलाच्या निवासस्थानावर ईडीने छापा टाकल्यानंतर लगेचच त्यांना अटक करण्यात आली. ईडीने सांगितले की, भावांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा खटला नागपूर पोलिसांकडे (अजनी पोलिस स्टेशन) दाखल केलेल्या दोन एफआयआरशी संबंधित आहे.

वाचा - ठाकरे-पवारांना जमलं नाही ते शिंदे-फडणवीसांनी केलं, बच्चू कडूंकडून स्तुतीसुमनं

ईडीने सांगितले की, सतीश उके आणि प्रदीप उके यांच्याविरुद्ध पहिला पोलीस एफआयआर मोहम्मद जफर, मयत मोहम्मद समद यांच्या पुतण्याने दाखल केला होता, जो नागपुरातील मौजा बोखरा येथे पाच एकर जमिनीचा मालक होता. त्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून जमीन ताब्यात घेतल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

दुसरा पोलीस एफआयआर ऐश्वर्या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सचिव शोभाराणी राजेंद्र नलोडे यांनी सतीश उके, प्रदीप उके आणि इतरांविरुद्ध दाखल केला असून, त्यांनी नागपूरच्या मौजा बाबुलखेडा येथील त्यांच्या सोसायटीच्या दीड एकर जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप केला आहे.

फडणवीसांविरोधात खटला

सतीश यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हेगारी प्रकरणे "उघड न केल्याबद्दल" फडणवीस यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली होती. भाजपचे नेते फडणवीस यांनी 2014 मध्ये 1996 आणि 1998 मध्ये फसवणूक आणि बनावट कागदपत्रे दाखल केल्याचे दोन गुन्हे लपवून खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचा आरोप उके यांनी केला होता.

वाचा - ...तर संजय राऊतांवर होऊ शकतो हल्ला? भुजबळांनी व्यक्त केली भीती, सांगितला बेळगाव लढ्याचा इतिहास

त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सीबीआय न्यायाधीश बी.एच. लोया यांच्या 'संशयास्पद आणि अकाली' मृत्यूची पोलीस चौकशीची मागणी केली. सोहराबुद्दीन शेख कथित बनावट चकमक खटल्याच्या सुनावणीचे अध्यक्ष असलेले न्यायाधीश लोया यांचा 2014 मध्ये नागपुरात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

सतीश उके हे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख नाना पटोले यांचे वकील देखील आहेत, ज्यांनी आयपीएस अधिकारी आणि माजी राज्य गुप्तचर प्रमुख रश्मी शुक्ला आणि इतरांविरुद्ध बेकायदेशीरपणे फोन टॅप केल्याबद्दल येथील दिवाणी न्यायालयात 500 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.

First published:

Tags: Devendra Fadnavis, Nagpur News