मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nagpur School Bus Accident : नागपुरात स्कूल बसचा थरार 14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, धक्कादायक व्हिडिओ समोर

Nagpur School Bus Accident : नागपुरात स्कूल बसचा थरार 14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, धक्कादायक व्हिडिओ समोर

नागपुरातील खसाळा येथे एका शालेय विद्यार्थ्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. हा धक्कादायक प्रकार बसचालकाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे समोर आले आहे.

नागपुरातील खसाळा येथे एका शालेय विद्यार्थ्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. हा धक्कादायक प्रकार बसचालकाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे समोर आले आहे.

नागपुरातील खसाळा येथे एका शालेय विद्यार्थ्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. हा धक्कादायक प्रकार बसचालकाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे समोर आले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

नागपूर, 22 नोव्हेंबर : नागपुरातील खसाळा येथे एका शालेय विद्यार्थ्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार बसचालकाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे समोर आले आहे. या घटनेचा पूर्ण व्हिडिओ व्हायरल झाल्याने जोरदार चर्चा होत आहे. स्कूल बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघतात 8 वीच्या वर्गात शिकणाऱ्या 14 वर्षीय वर्षाच्या सम्यक कळंबे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. खसाळा येथील मेरी पाऊसपिन्स या शाळेसमोर विद्यार्थ्यांना बसने एका खासगी स्कूल व्हॅनला धडक दिली. त्यानंतर तीन विद्यार्थी बसच्या खाली आले. त्यांतील दोन मुले चाकांच्या गॅपमधून बाहेर पडले. पण एक मुलगा बससोबत घासत दूर गेल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. या अपघातात विद्यार्थ्याला मार लागला तसेच त्याचे डोके आणि चेहरा रक्ताने माखला होता. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले परंतु त्याला मृत घोषीत करण्यात आले आहे.

हे ही वाचा : स्पर्धा परीक्षेच्या तयारीदरम्यान ओळख; तरुणीचा मृतदेह 4 दिवस कारमध्ये अन् परफ्यूमचा मारा, भयंकर घटना

सर्वप्रथम स्कुल बसने स्कुटीला धडक दिली. त्या स्कुटीवरील महिला खाली पडली. तिला उचलायला एक विद्यार्थी सरसावला. पण तेवढ्यात स्कुल बसने खासगी व्हॅनला धडक दिली. यामध्ये तीन मुले व्हॅनच्या खाली सापडली. दरम्यान त्यांच्यामध्ये एक रिक्षा फसली होती. यातील निसटलेल्या एका मुलाने प्रसंगावधान बाळगत रिक्षाकडे धावत गेला परंतु तो किरकोळ जखमी झाला होता.

दरम्यान बसखाली सापडलेल्या विद्यार्थ्याला उचलत काही जण धावले व त्याला शाळेच्या आवारात घेऊन गेले. नंतर शाळेत प्रथमोपचार करून विद्यार्थ्याला हाॅस्पिटलमध्ये नेण्यात आले.

नागपुरात एकाच दिवशी दोन घटना

नागपुरात एकाच दिवशी दोन घटना घडल्याने नागपुरात याची जोरदार चर्चा होता आहे. आज (दि.22) सकाळीच स्कूल व्हॅनचा अपघात झाला होता. लहान विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनचे चाक उड्डाणपुलावरून धावत असताना निखळले. त्यानंतर व्हॅन बरेच अंतर तशीच एका बाजूने रोडवर घासत गेली. सुदैवाने या घटनेत कोणताही विद्यार्थी जखमी झाला नाही. आज सकाळी नागपूर वर्धा रोडवरील उड्डाण पुलावर ही घटना घडली.

हे ही वाचा : श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कुठे कुठे ठेवले; आफताबने ठेवलाय हिशोब, धक्कादायक माहिती उघड

टाटा मॅजिक व्हॅन मध्ये काही विद्यार्थी शाळेत जात असताना अचानक व्हॅनच्या डाव्या बाजूचा मागचं चाक निखळलं. त्यामुळे स्कूल व्हॅन काही अंतरापर्यंत तशीच रोडवर घासत गेली. चालकाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्याने ब्रेक लावले. सकाळी 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.  सकाळची वेळ असल्यामुळे उड्डाण पुलावर जास्त गर्दी नसल्यामुळे इतर कुठलेही वाहन या व्हॅनला धडकले नाही आणि मोठी दुर्घटना टळली.

First published:

Tags: Accident, Major accident, Nagpur, Nagpur News