मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सुट्टीच्या दिवशी नागपुरातून आली चिंता वाढवणारी बातमी, चार दिवसात बदलली परिस्थिती

सुट्टीच्या दिवशी नागपुरातून आली चिंता वाढवणारी बातमी, चार दिवसात बदलली परिस्थिती

आता नागपुरातून (Nagpur) एक मोठी बातमी समोर आली आहे.

आता नागपुरातून (Nagpur) एक मोठी बातमी समोर आली आहे.

आता नागपुरातून (Nagpur) एक मोठी बातमी समोर आली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

नागपूर, 26 डिसेंबर: काही महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेला कोरोना व्हायरस (corona virus) पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनला आहे. ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यातच आता नागपुरातून (Nagpur) एक मोठी बातमी समोर आली आहे. नागपुरात कोरोनाचं (Corona Virus) चित्र अवघ्या चार दिवसात बदलेलं दिसलं आहे.

नागपूरमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. नागपुरात रविवारी म्हणजेच आज 33 कोविड रुग्ण आढळून आले आहे.

हेही वाचा-  नगरमध्ये Corona Virus चा उद्रेक, तीन दिवसात 52 विद्यार्थी पॉझिटिव्ह

कोरोना रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. गुरुवारी हा आकडा 6 होता. तर शुक्रवारी तो वाढून 10 वर पोहोचला. तर धक्कादायक म्हणजे शनिवारी हा आकडा 24 झाला. तर रविवारी कोरोना रुग्णांची संख्या 33 वर जाऊन पोहोचली.

महाराष्ट्रात कोरोना संसर्गाने (Covid-19 in Maharashtra) पुन्हा एकदा जोर पकडला आहे. गेल्या एका दिवसात कोरोनाचे (Coronavirus)1485 रुग्ण आढळले आहेत. नवीन वर्षापूर्वी कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्य सरकार चिंतेत आहे. कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रात संसर्ग टाळण्यासाठी (Maharashtra corona updates) पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी

1) संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत बंदी असेल.

2) लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.

3) इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.

4) उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशाठिकाणी क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी २५ टक्के उपस्थिती असेल. अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.

हेही वाचा- 'या' छोट्याशा घराची किंमत कोटींच्या घरात; फक्त बाथरूम पाहून खरेदीसाठी तयार 

5) क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.

6) वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना २७ नोव्हेंबर २०२१ चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.

7) उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.

8) याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी त्यानी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील.

9) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.

First published:

Tags: Coronavirus, Nagpur