Home /News /maharashtra /

गोध्रा हत्याकांड, आठ वर्ष शिक्षा, तरीही नागपुरात मोठा दरोडा, पोलिसांकडून कुख्यात गुंडांचा पंचनामा

गोध्रा हत्याकांड, आठ वर्ष शिक्षा, तरीही नागपुरात मोठा दरोडा, पोलिसांकडून कुख्यात गुंडांचा पंचनामा

नागपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुजरातच्या बहुचर्चित गोध्रा हत्याकांडमधील दोन आरोपींना नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

    नागपूर, 22 जुलै : आठ वर्ष कारावासाची शिक्षा भोगल्यानंतरही काही नराधमांची अक्कल अजिबात जागेवर येत नाही. नागपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुजरातच्या बहुचर्चित गोध्रा हत्याकांडमधील दोन आरोपींना नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे हे आरोपी आठ वर्ष कारावासाची शिक्षा भोगून आले आहेत. तरीही त्यांची हिंमत एवढी मोठी की त्यांनी थेट फ्लिपकार्टच्या गोदामावर दरोडा टाकला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर ते मुद्देमाल घेऊन जात असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली तेव्हा त्यांनी लोखंडी रॉडने पोलिसांना मारहाण केली. त्यांच्या हल्ल्यात पोलीस निरीक्षक गंभीर जखमी झाले होते. नागपूर ग्रामीण पोलीस आरोपींच्या शोधात होते. अखेर या आरोपींना बेड्या ठोकण्यात नागपूर पोलिसांना यश आलं आहे. नेमकं प्रकरण काय? गुजरातच्या बहुचर्चित गोध्रा हत्याकांडमधील दोन आरोपींना नागपूर ग्रामीण पोलिसांनी लुटीच्या एका प्रकरणात अटक केली आहे. 23 जून रोजी लुटारूंच्या या टोळीने एमआयडीसी भागातील फ्लिपकार्टच्या गोदामामध्ये दरोडा टाकला होता. कंटेनरने पळून जात असताना गस्तीवर असलेल्या उमरेड पोलिसांनी त्यांना अडवले. तेव्हा त्यांनी पोलिसांना रॉडने मारहाण करून तिथून पळ काढला होता. तेव्हापासून नागपूर ग्रामीण पोलीस या आरोपींच्या मागावर होते. (सलमान खान पोलीस आयुक्तांच्या भेटीला; 'त्या' धमकीच्या पत्राचा उल्लेख करीत केली मोठी मागणी) पोलिसांनी तपास करत असताना बालाघाट आणि गोध्रा येथे छापेमारे केली. यावेळी पोलिसांनी आरोपी उस्मानगणी मोहम्मद आणि जाफरू बांडी या दोघांना अटक केली. हे दोघे आरोपी 2002 च्या गोध्रा हत्याकांडातील असून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यांनी याआधी आठ वर्ष कारावास भोगला असल्याची माहिती नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजय मगर यांनी दिली. यातील इतर तीन आरोपी फरार असून ही टोळी वेगवेगळ्या राज्यात जाऊन लुटमाऱ्या करत असाव्या असा पोलिसांना संशय आहे. आरोपींना बेड्या ठोकल्यानंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेवून माहिती दिली. "पोलीस निरीक्षक भटुलाल पांडे यांनी त्यांच्या दोन कर्मचाऱ्यांसह 30 जून 2022 रोजी एका कंटेनरचा पाठलाग केला होता. भटुलाल पांडे यांच्या पथकाने जवळपास 18 किमीपर्यंत कंटेरनरचा पाठलाग केला होता. यावेळी आरोपींनी भटुलाल यांच्यावर हल्ला केला होता. आरोपींनी फ्लिपकार्टच्या गोदामात दरोडा टाकला होता. तिथून ते मुद्देमाल घेऊन पोबारा होण्याच्या प्रयत्नात होते. यावेळी त्यांचा पाठलाग करताना हा सगळा प्रकार घडला होता", अशी माहिती नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजय मगर यांनी दिली.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Crime, Nagpur, Nagpur News

    पुढील बातम्या