नागपूर : बजेटआधी नागपूरकरांचं बजेट बिघडवणारी बातमी आहे. नागपूरकर किंवा पर्यटनाच्या निमित्ताने आलेल्या जे लोक आहेत ते जर मेट्रोने प्रवास करत असतील तर त्यांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. नागपूर मेट्रोच्या तिकीट दरात महिन्याभरात तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नागपूरकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
मेट्रोची प्रवाशीसंख्या वाढू लागल्याने तिकीट दरवाढीचा सपाटा लावला आहे. मेट्रोच्या तिकिटांत टौपटीने वाढ झाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. पूर्वी सहा किमी साठी ५ रुपये तर १२ किमीसाठी १० रुपये तिकीट घेतलं जात होतं. तर १२ किमीनंतर २० रुपये तिकीट आकारलं जात होतं.
Budget 2023: इन्कम टॅक्स एक्झम्प्शन, डिडक्शन आणि रिबेटमध्ये नक्की काय फरक असतो? सोप्या भाषेत उत्तर
आता २ किमीसाठी १० रुपये तर २ ते ४ किमीसाठी १५ आणि १८ किमीपेक्षा जास्त अंतरासाठी 40 रुपये दर मोजावे लागत आहेत. तिकीटाचे दर वाढल्याने विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे.
आधी मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी होती. मात्र ही संख्या 2 लाखांपर्यंत पोहोचल्यानंतर आता मेट्रोने दरवाढीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आधीच महागाईमुळे हाल झाले आहेत. त्यामध्ये आणखी दरवाढ केल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nagpur, Nagpur News