मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nagpur: नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयात चक्क ओली पार्टी, सुरक्षारक्षांच्या दारू पार्टीचा VIDEO VIRAL

Nagpur: नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयात चक्क ओली पार्टी, सुरक्षारक्षांच्या दारू पार्टीचा VIDEO VIRAL

नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयात ओली पार्टी, रुग्णालयातील दारू पार्टीचा VIDEO VIRAL

नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयात ओली पार्टी, रुग्णालयातील दारू पार्टीचा VIDEO VIRAL

Liquor party in Nagpur Mental hospital: सोशल मीडियात नागपुरातील दारू पार्टीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नागपुरातील प्रदेशिक मनोरुग्णालयातील असल्याचं समोर आलं आहे.

नागपूर, 24 नोव्हेंबर : चक्क रुग्णालयातच दारू पार्टी (liquor party in Hospital) होत असल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरातून समोर आला आहे. नागपूर प्रादेशिक मनोरुग्णालयातील (Nagpur mental hospital) सुरक्षारक्षकांच्या दारू पार्टीचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. रुग्णालयाची सुरक्षा ज्यांच्या खांद्यावर असते तेच सुरक्षारक्षक रुग्णालयात दारू पार्टी करत असल्याने सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. (Liquor party in Nagpur mental hospital video viral)

नागपूर प्रादेशिक मनोरुग्णालयातील दारू पार्टीचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. या व्हिडीओत दिसणारे आणि पार्टीत मग्न असलेले हे दुसरे-तिसरे कुणी नाही तर रुग्णालयाचे सुरक्षारक्षकच असल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी सुरक्षारक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रादेशिक मनोरुग्णालये आहेत. ज्यामध्ये ठाणे, पुणे, नागपूर, रत्नागिरी जिल्ह्यांचा समावेश आहे. या मनोरुग्णालयात अतिशय कडेकोट सुरक्षाव्यवस्था असते. मात्र, यापैकीच एक असलेल्या नागपूर येथील मनोरुग्णालयात सुरक्षारक्षकांकडून अशाप्रकारे दारू पार्टी होत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

वाचा : नाशकात हत्येचं सत्र सुरुच, किरकोळ वादातून तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे याबाबत माहिती मिळू शकलेली नाहीये. मात्र, रुग्णालयातील गार्ड रूममध्ये ही ओली पार्टी रंगली होती. या पार्टीचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर या ओल्या पार्टीचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर वैद्यकीय अधीक्षक यांनी सुरक्षारक्षक आणि उपस्थित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

पुणे पालिकेच्या आवारात जमादाराची दारू पार्टी

गेल्यावर्षी पुण्यात कोरोनाचा उद्रेक झाला. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. पण, पुणे महानगर पालिकेतील मुख्य जमादार दारु पार्टी करत असल्याचं समोर आलं होतं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पुणे महानगर पालिकेतील मुख्य जमादार ज्यांच्यावरती पुणे महानगर पालिकेच्या सर्व मालमत्तेच्या सुरक्षेची जबाबदारी असते. तेच सुरक्षा जमादार दररोज महानगर पालिकेत राजरोसपणे दारूच्या पार्ट्या करत असल्याचं समोर आलं होतं.

जुलै 2020 मध्ये ही घटना घडली होती. रवींद्र असं या जमादाराचं नाव आहे. पालिकेच्या आवारातच या जमादाराने दारू पार्ट्या सुरू केल्या होत्या. याची माहिती स्थानिक सेवकांना कळाली. त्यांनी आधी या जमादारीची समजूत काढली पण, त्याने त्यांचं काही ऐकलं नाही. या सेवकांनी जमादाराला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्या जमादाराने त्या सेवाकाशी हातापायी करण्यास सुरुवात केली.

First published:

Tags: Crime, Nagpur