मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Nagpur : बापे रे! वरातीचा घोडा संतापला अन् नवरदेवाचा पायच मोडला; शेवटी स्ट्रेचरवर पडूनच करावं लागलं लग्न, पहा VIDEO

Nagpur : बापे रे! वरातीचा घोडा संतापला अन् नवरदेवाचा पायच मोडला; शेवटी स्ट्रेचरवर पडूनच करावं लागलं लग्न, पहा VIDEO

X
नागपूर

नागपूर : बँडच्या पथकाच्या गाण्यावर घोडा काही काळ नाचला. मात्र तो अचानक संतापला आणि त्याने नवरदेवालाच खाली पाडले. त्यात नवरदेवाचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यामुळे नवरदेवाला स्ट्रेचरवर झोपवूनच वऱ्हाडी मंडळींनी (wedding ceremony) लग्न उरकलं.

नागपूर : बँडच्या पथकाच्या गाण्यावर घोडा काही काळ नाचला. मात्र तो अचानक संतापला आणि त्याने नवरदेवालाच खाली पाडले. त्यात नवरदेवाचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यामुळे नवरदेवाला स्ट्रेचरवर झोपवूनच वऱ्हाडी मंडळींनी (wedding ceremony) लग्न उरकलं.

पुढे वाचा ...

    नागपूर, 2 जून : 'भोली सुरत दिल के खोटे, नाम बडे और दर्शन खोटे', या गाण्यावर थिरकणाऱ्या वऱ्हाडी मंडळीच्या (wedding ceremony) गर्दीच घोड्यावर बसून नवरदेवदेखील आनंदात थिरकत होता. गाणं ऐकताच घोड्यानेदेखील ठेका धरला आणि दोन पायावर उसळ्या मारत नाचू लागला. पण, अचानक घोडा संतापला आणि त्यानं मोठी उसळी घेतली अन् नवरदेव जमिनीवर पडला आणि नवरदेवाचा पाय फ्रॅक्चर झाला. झालेला प्रकार पाहताच वऱ्हाडी मंडळींची पुरती तारांबळ उडाली, या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे.

    नवरदेवाच्या उजव्या मांडीला फ्रॅक्चर

    बँडच्या पथकाने 'भोली सुरत दिल के खोटे, नाम बडे और दर्शन खोटे' हे गाणे वाजविण्यास सुरुवात केली, घोडा ही त्यावर काही काळ नाचला. मात्र तो अचानक संतापला आणि त्याने नवरदेवालाच खाली पाडले. आणि ह्यातच नवरदेवाच्या उजव्या मांडीचे हाड फ्रॅक्चर झाले आणि शेवटी नवरदेवाला स्ट्रेचरवर ठेवूनच लग्न उरकावे लागले.

    वाचा : 5 सोन्याच्या अंगठ्यांसाठी हत्या करून मृतदेह दुचाकीसह पुरला विहिरीत, वर्ध्यातील धक्कादायक घटना

    नागपूर जिल्ह्यातील सावनेरमधील मंगल कार्यालयात हा प्रकार घडला. कोराडी येथील नवरदेव आणि वऱ्हाडी मंडळी आली होती. प्रसंगी नवरदेवाने हनुमान मंदिरात जाऊन पूजा केली आणि वरातही मंगलकार्यालयाकडे निघाली. वाटेत नवरदेव घोड्यावर आणि व्हराडी मंडळी ही बँडच्या ठेक्यावर नाचत मंगलकार्यालयाच्या जवळ पोहचली.

    स्ट्रेचरवर झोपवूनच नवरदेवाचे लावलं लग्न

    'भोली सुरत दिल के खोटे, नाम बडे और दर्शन खोटे' हे गाणे लागले आणि सगळे नाचण्यात मग्न झाले. पण, वरातीचा घोडा अचानकपणे संतापला आणि त्याने नवरदेवालाच खाली पाडले. हा प्रकार पाहून सर्वांच्यात तोंडचे पाणी पळाले. मात्र, लगेचच नवरदेवाला प्राथमिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान कळले की, नवरदेवाच्या कंबरेखालील हाड फ्रॅक्चर झाले आहे. त्यानंतर वऱ्हाडी मंडळीनी नवरदेवाला स्ट्रेचरवर झोपवूनच नववधूसोबत लग्न लावले. नंतर लगेचच नवरदेवाला नागपूर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.

    First published:

    Tags: Nagpur News, Viral video., Wedding video