नागपूर, 22 मे : सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price) किमती वाढत असल्याने अनेकजण CNG चा पर्याय निवडत आहे. मात्र गेल्या काही दिवसात सीएनजीच्या किमतीही वाढल्याने नागरिकांसमोर मोठा प्रश्न आ वासून उभा आहे. दरम्यान नागपूरमध्ये पेट्रोलपेक्षा CNG महाग मिळत असल्याचं समोर आलं आहे.
नागपूरमध्ये CNG 110 रुपये प्रति किलो मिळत आहे. तर पेट्रोल 102 रुपये प्रति लिटर आहे. नागपूरमध्ये देशातील सर्वात महागडी CNG ग्राहकांना खरेदी करावी लागत आहे.
महागाईत होरपळत असलेल्या सर्वसामान्य जनतेला केंद्र सरकारने अखेर काल दिलासा दिला आहे. माहिती देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) म्हणाल्या, "आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी करत आहोत. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी (Petrol Diesel Price) कमी होणार आहेत. यामुळे सरकारच्या महसुलावर दरवर्षी सुमारे एक लाख कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
पेट्रोल आणि डिझेलची किंमत घरबसल्या जाणून घेऊ शकता
तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (How to check diesel petrol price daily). इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपी 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.