मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /माझं अपहरण झालंय म्हणत त्याने केला पत्नीला फोन, पोलिसांनीही सुरू केला शोध आणि मग...

माझं अपहरण झालंय म्हणत त्याने केला पत्नीला फोन, पोलिसांनीही सुरू केला शोध आणि मग...

Nagpur drunk man called wife saying I was kidnapped: नागपुरात दारुड्याने असं काही केलं की, त्यामुळे संपूर्ण पोलीस स्टेशन कामाला लागलं मात्र त्यानंतर जे समोर आले त्याने पोलिसही अवाक झाले आहेत.

Nagpur drunk man called wife saying I was kidnapped: नागपुरात दारुड्याने असं काही केलं की, त्यामुळे संपूर्ण पोलीस स्टेशन कामाला लागलं मात्र त्यानंतर जे समोर आले त्याने पोलिसही अवाक झाले आहेत.

Nagpur drunk man called wife saying I was kidnapped: नागपुरात दारुड्याने असं काही केलं की, त्यामुळे संपूर्ण पोलीस स्टेशन कामाला लागलं मात्र त्यानंतर जे समोर आले त्याने पोलिसही अवाक झाले आहेत.

नागपूर, 3 डिसेंबर : दारूची नशा काय काय करवेल हे सांगता येत नाही. अश्याच एका दारुड्यामुळे नागपूर पोलिसांचे मात्र उगाचच बी पी हाय झाले. मंगळवारी रात्री एक महिला अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत हिंगणा पोलीस ठाण्यात (Hingana Police Station Nagpur) आली. माझे अपहरण झाले असे म्हणत तिचा नवरा गजेंद्र कोहरे (Gajendra Kohare) ह्याने फोन केला होता. नंतर अपहरणच नाही तर माझा अपघात झाला, लोक माझीच चूक आहे असे म्हणत आहेत आणि आता माझे अपहरण करून मला जीवे मारण्यासाठी घेऊन जात आहेत असे ही त्याने सांगितले. तक्रारदार महिलेने अशी माहिती पोलिसांना दिली. (Nagpur drunk man called saying I am abducted after this police search start and shocking information reveal)

अपहरणाचा प्रकार असल्याने पोलीस देखील सतर्क झाले. नाईट रॉउंडच्या सर्व पोलिसांना ह्या घटनेच्या मागावर लावले. क्राईम ब्रांचची मदत घेत मोबाइलचे सीडीआर ही काढायला लावले, कारण ह्या महाभागाचा फोन स्वीच ऑफ येत होता.

गजेंद्र तर दारू पियून कुठेतरी भलतीकडेच मोबाइल बंद करून पोहचला आणि झोपून गेला. सकाळी नशा उतरल्यावर बायकोला फोन केला आणि पुन्हा घरी परतला आला. मात्र आपण रात्री काय घडवून आणले, काय सांगितले ह्याचा ही त्याला गंध उरला नव्हता. आपण दारूच्या नशेत काय केले त्याची साधी कल्पनाही गजेंद्रला नव्हती.

वाचा : गळ घालून फिरायला नेलं अन् गळ्यावरून फिरवला चाकू

दारू उतरल्यानंतर पोलिसांनी त्याला बोलावून घेतले. त्याच्या एका कॉलमुळे पोलिसांनी रात्रभर त्याचा कसा शोध घेतला त्याची माहिती त्याला दिली. यानंतर असे पुन्हा केले तर कायदेशीर कारवाई केली जाईल असा ही दम पोलिसांनी गजेंद्र याला दिला. मात्र गजेंद्र त्याच्या चेहऱ्यावर त्याबद्दल तिळमात्रही पश्चाताप दिसत नव्हता. त्यामुळे दारू माणसाला काय काय करायला लागेल याचा नेम नाही.

यात नागपूर पोलिसांचे कौतुक करायला पाहिजे. अपहरण झाले म्हटल्यानंतर नागपूर पोलिसांनी जी तत्परता दाखवली आणि रात्रभर गजेंद्र याचा शोध घेण्यासाठी जे परिश्रम घेतले. त्यामुळे निश्चितच नागपूर पोलिसांनी आपल्या कर्तव्यात कुठेही कसर केला नाही. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक देखील होत आहे.

वाचा : हात बांधले, तोंडावर चिकटपट्टी लावून कापला गळा; नागपुरात महिला डॉक्टरची निर्घृण हत्या

नागपुरातील वयोवृद्ध महिला डॉक्टरच्या हत्येचं गूढ उकललं

नागपूर शहराला हादरवून सोडणाऱ्या देवकाबाई बोबडे (Devakabai Bobade) यांच्या हत्याकांडाचा उलगडा करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे. नातवानेच आजींची हत्या केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. मीतेश पाचभाई हा आरोपी असून तो मृतक आजींचा नातू आहे. आरोपीचे इंजिनिअरिंगचे शिक्षण झाले असून तो मृतकच्या घरी वर आईवडिलांसोबत राहत होता.

First published:

Tags: Crime, Nagpur, Nagpur News