नागपूर, 24 मे : कोरोनाकाळात (Corona Pandemic) अनेकांचा रोजगार गेला. अनेकांचे व्यवसायही बुडाले. त्यामुळे अनेक जण नैराश्यात (Depression) गेले. इतकेच नव्हे तर काही जणांनी नैराश्यात आत्महत्येचे (Suicide) पाऊल उचलल्याचे तुम्ही वाचले असेल. त्यात आता नागपूर जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
काय आहे घटना -
नागपुरच्या कळमना पोलीस ठाण्यात (Kalmana Police Station) हद्दीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका पती पत्नीने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं आहे. मनोज लोधी आणि ममता लोधी, असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. 45 वर्षांचा नवरा आणि 40 वर्षांच्या बायकोनं आत्महत्या केल्यानंतर आणखी एक खुलासा झाला आहे. पोलिसांना तपासादरम्यान, एक सुसाईड नोट मिळाली आहे.
हेही वाचा - Jalgaon Crowd Beating : वाहनाला कट लागल्याचे कारण, जमावाने केली मारहाण; जखमी महिलेचा मृत्यू
सुसाईड नोटमध्ये काय -
मनोज लोधी जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होते. हे दाम्पत्य मूळ गोंदिया (Gondia family suicide) येथील आहे. या कुटुंबाला कोरोना महासंकटात आर्थिक फटका बसला होता. तसेच या दाम्पत्याला आजारांनीही ग्रासलं होतं. मनोज यांना पॅरेलिसिस (Paralysis) झाला होता. प्रकृतीसाठी खर्च, व्यवसायातील अडचणी आणि राहण्यासाठी चिंता या समस्या त्यांच्यासमोर उभ्या राहिल्या होत्या. यामुळे या मनोज लोधी आणि ममता लोधी या दाम्पत्याने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या केलंलं दाम्पत्य हे नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गौरी नगर परिसरात राहत होते. या आत्महत्येच्या घटनेमुळे नागपुरच्या कळमना भागात खळबळ उडाली आहे.
नाशिकमध्येही पंचवटी परिसरात वडील आणि मुलाची आत्महत्या -
नाशिकमधील पंचवटी परिसरात (Panchvati area of Nashik) वडील आणि मुलाने आत्महत्या (Father and Son suicide) केली आहे. वडील आणि मुलाच्या सामूहिक आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Father and son suicide in Nashik) जगदीश जाधव आणि प्रणव जाधव अशी मृतक वडील-मुलाचे नाव आहे. जगदीश जाधव आणि प्रणव जाधव यांनी नाशिकमधील आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.