मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Congress vs BJP: नागपुरात काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने, नितीन गडकरींच्या घराबाहेर राडा, LIVE VIDEO

Congress vs BJP: नागपुरात काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने, नितीन गडकरींच्या घराबाहेर राडा, LIVE VIDEO

नागपुरात काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने, नितीन गडकरींच्या घराबाहेर राडा, LIVE VIDEO

नागपुरात काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने, नितीन गडकरींच्या घराबाहेर राडा, LIVE VIDEO

Congress BJP workers clash infront of Nitin Gadkari house in Nagpur: नागपुरात काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले आणि जोरदार गोंधळ झाला आहे. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाबाहेर काँगर्से पक्षाकडून आंदोलन सुरू आहे.

नागपूर, 10 फेब्रुवारी : नागपुरात काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने (Congress - BJP workers) आले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या निवासस्थानाबाहेर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाल्याचं पहायला मिळत आहे. कोरोना पसरण्यास महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार असल्याचं विधान केलं आणि त्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून 'मोदी माफी मागा' आंदोलन करण्यात येत आहे. त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते आक्रमक होत काँग्रेस पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली.

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या घरासमोरील सुरक्षा पोलिसांनी वाढवली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या गडकरी यांच्या घराला घेराव घातल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील घरासमोर काँग्रेसकडून निषेध मोर्चा काढून प्रदर्शन करण्यात येत आहे. तर त्याच वेळी भाजप कार्यकर्ते देखील काँग्रेस कार्यकर्त्याना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी गडकरींच्या घराबाहेर जमा झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेमध्ये देशात कोरूना पसरायला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस जबाबदार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे काँग्रेसकडून राज्यभर याचा निषेध केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसच्या वतीने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचे ठरवले असता दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरासमोर आले.

वाचा : मोदींनी महाराष्ट्राचा अपमान केला, भाजप कार्यालयासमोर 'माफी मागा' आंदोलन : काँग्रेस

तणावाची परिस्थिती बघता पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागून घेतली असून एसआरपीएफच्या तुकड्या देखील आंदोलनस्थळी तैनात केल्या आहेत. पोलिसांनी आंदोलनकर्त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

भाजप कार्यालयांबाहेर काँग्रेसचे आंदोलन

दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत भाजप विरोधात माफी मागा आंदोलन करणार असल्याचं म्हटलं होतं. नाना पटोले म्हणाले होते, पंतप्रधान यांनी शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचा अपमान केला. भाजपचे प्रचारक म्हणून मोदी वागत असतील तर त्या पदाची गरिमा घालवत आहेत. भाजप आणि पंतप्रधान यांनी माफी मागितली पाहिजे. भाजपच्या कार्यालयासमोर आम्ही माफी मागा असे फलक घेऊन उभं राहणार आहोत. हे आंदोलन भाजप कार्यालयांबाहेर करण्यात येईल.

वाचा : मोदींच्या भाषणामुळे वाईट वाटलं, कोरोना महामारीत माणुसकी विसरलो का? सुप्रिया सुळेंचा सवाल

नमस्ते ट्रम्पच्या माध्यमातून तुम्ही कोरोना वॉरिअर बनला का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विधानाचं भाजप समर्थन करत असेल तर ते महाराष्ट्रद्रोही आहेत. गुजरातमधून 1033 श्रमिक ट्रेन सोडल्या आणि महाराष्ट्रातून 800 ट्रेन सोडल्या. लोकसभेत भाषण करताना मोदींनी महाराष्ट्र्राला कोरोना स्प्रेडर म्हटलं मग मला विचारायचं आहे की, नमस्ते ट्रम्प कार्यक्रम फेब्रुवारी महिन्यात गुजरातमध्ये केला त्यामाध्यमातून तुम्ही काय केलं? नमस्ते ट्रम्प च्या माध्यमातून तुम्ही कोरोना वॉरिअर झालात का? असा सवालही नाना पटोले यांनी केला होता.

First published:

Tags: BJP, Nagpur, Nitin gadkari, काँग्रेस