नागपूर, 31 डिसेंबर : नागपूरच्या महाल परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. एका अज्ञात व्यक्तीच्या फोन करून ही धमकी दिली. या प्रकरणात नागपूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून संघ मुख्यालयाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे. यापूर्वीही देखील संघाचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.
Video : RSS मुख्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी..#nagpur pic.twitter.com/6kACdauJLl
— News18Lokmat (@News18lokmat) December 31, 2022
धमकीनंतर पोलिसांकडून सुरक्षेचा आढावा
नागपूरच्या महाल परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. एका अज्ञात व्यक्तींने फोन करून ही धमकी दिली. या प्रकरणात नागपूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून संघ मुख्यालयाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे.
वाचा - बंडखोरी ते रेशीमबाग.. ठाकरेंच्या प्रत्येक आरोपांवर उत्तर.. मुख्यमंत्री म्हणाले..
नूपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर आली होती धमकी
तत्कालीन भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ही धमकी देण्यात आली होती. यानंतर एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. राज मोहम्मद असे या व्यक्तीचे नाव असून त्याला पोलिसांनी तामिळनाडू राज्यातून अटक केली होती. लखनौ आणि गोंडा या दोन RSS कार्यालयांना बॉम्बने स्फोटाची धमकी देण्यात आली होती. राज मोहम्मद याने फोनवरून उत्तर प्रदेशातील दोन ठिकाणांसह एकूण 6 ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी दिली होती. पोलिसांनी आरएसएस कार्यालयाची सुरक्षा वाढवली आहे.
फोटोग्राफी/व्हिडिओग्राफीला बंदी
दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, महाल, नागपूर येथील सभोवतालच्या परिसरात फोटोग्राफी/व्हिडिओग्राफी तसेच ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यास नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाने बंदी घातली आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी दक्षता घ्यावी व आदेशाचे पालन करावे असे आवाहन आयुक्तालयाने केले आहे. या पूर्वी 1 जून 2006 रोजी संघ मुख्यालयावर दहशतवादी हल्ला झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.