नागपूर, 19 डिसेंबर : कार चालवताना निष्काळजीपणा केल्याने दोन तरुण गाडीखाली चिरडले (youths crushed under car) गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुरात ही घटना घडली आहे. (Horrible accident in Nagpur) चालकाने ब्रेक दाबण्याऐवजी अॅक्सिलेटर दाबला आणि त्यामुळे गाडी थेट दोन तरुणांच्या अंगावरुन गेली. नागपुरात घडलेली ही घटना त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अंगावर काटा आणणारी ही दृश्य पाहून अपघात किती भीषण होता याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. (Horrible accident in Nagpur caught in CCTV, video goes viral)
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नागपुरातील सावनेर तालुक्यात ही घटना घडली आहे. अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे ज्यात दिसत आहे की, एक व्हाईट कलरची कार पार्कक केली आहे आणि त्याच परिसरात तीन तरुण बाकड्यांवर बसले आहेत. पार्क केलेली गाडी एक व्यक्ती बाहेर काढण्यासाठी रिव्हर्स घेतो. यावेळी त्याने ब्रेक दाबण्याऐवजी चुकून एक्सिलेटर दाबला आणि गाडी थेट त्या तरुणांच्या अंगावर गेली.
गाडी आपल्या दिशेने वेगात येत असल्याचं पाहून एक तरुण तात्काळ बाकड्यावरुन उठला तर दुसऱ्या दोघांना काही कळण्यापूर्वीच गाडी त्यांच्या अंगावरुन गेली. या घटनेत दोन्ही तरुण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वाचा : 12 तासांत दोन नेत्यांच्या हत्येने खळबळ, जमावबंदीचे आदेश लागू
मिळालेल्या माहितीनुसार, चालक हा दारूच्या नशेत होता आणि दारूच्या नशेतच त्याच्याकडून हे कृत्य झाल्याचं बोललं जात आहे. इतकेच नाही तर हे तिन्ही तरुण त्याचे मित्र असल्यातंही बोललं जात आहे. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.
दुचाकी एकमेकांना धडकल्या, अपघाताचा Shocking VIDEO
इतक्या वेगात धडकल्या की अपघातात बाईक चालक चालक रस्त्याच्या कडेला फेकला गेला. सुदैवाने कोणतीही या अपघातात जीवितहानी झाली नाही मात्र दुचाकीवर स्वारांना गंभीर दुखापत झाली आहे.
रस्त्याकडेला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या भीषण अपघाताचा थरार कैद झाला आहे. याच ठिकाणी समोरून येणाऱ्या गाड्यांचा अंदाज न आल्याने अनेक वेळा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी ग्रामस्थांनी रस्त्यावर गतिरोधक टाकण्याची मागणी ग्रामपंचायतीकडे केली आहे. मात्र अद्याप त्यावर उपाययोजना केलेली दिसून येत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Cctv footage, Nagpur