Home /News /maharashtra /

लग्नाला थेट नाही म्हणाली; नागपुरात नकार दिल्यामुळे अल्पवयीन मुलीला मिळाली शिक्षा

लग्नाला थेट नाही म्हणाली; नागपुरात नकार दिल्यामुळे अल्पवयीन मुलीला मिळाली शिक्षा

आरोपी तरुण हा या अल्पवयीन विद्यार्थिनीवर काही काळापासून लग्नासाठी दबाव टाकू लागला होता. मात्र, तो बेरोजगार असल्याने तिने त्याला नकार दिला.

    नागपूर, 21 जुलै : क्राईम सिटी म्हटल्या जाणाऱ्या नागपुरमधून सातत्याने गुन्हेगारीशी संबंधित घटना समोर येत आहेत. पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा पदार्फाश केला. ही घटना ताजी असतानाच एका हवाई क्षेत्राशी संबंधित प्रशिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीचा आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिपिंग करून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - आरोपीसोबत एका कार्यक्रमात 17 वर्षीय विद्यार्थिनीची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांचे रुपांतर मैत्रीत झाले. यानंतर अल्पेशने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढळे. दोघेही सोबत फिरायला लागले. यादरम्यान अल्पेशने विद्यार्थिनीची व्हिडिओ क्लिपिंग तयार केली. याप्रकरणी कपिल नगर पोलिसांनी आरोपी अल्पेश राजपाल शेंडे (22, रा. पंचशील नगर) याला अटक केली आहे. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल - आरोपी तरुण हा या अल्पवयीन विद्यार्थिनीवर काही काळापासून लग्नासाठी दबाव टाकू लागला होता. मात्र, तो बेरोजगार असल्याने तिने त्याला नकार दिला. त्यानंतर त्याने नातेवाईकांना क्लिपिंग पाठवण्याची धमकी दिली. तसेच आक्षेपार्ह वर्तन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराला कंटाळलेल्या मुलीने कपिल नगर पोलिसात तक्रार दाखल केली. यावरुन पोलिसांनी आरोपी अल्पेश शेंडेविरोधात विनयभंग, धमकावणे आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आहे. कपिल नगर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे. हेही वाचा - पर्सनल डायरी काका-काकूने वाचली, अन् नागपुरातील उच्चशिक्षित तरुणीचं टोकाचं पाऊल नागपूरच्या हॉटेलमध्ये सुरू होता सेक्स रॅकेट; पोलिसांची मोठी कारवाई नागपुरातून पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. परराज्यातील मुलींना पैशांचे आमिष दाखवत त्यांच्याकडून देहव्यापार करविणाऱ्या सेक्स रॅकेटचा भंडाफोड करण्यात आला आहे. ही कारवाई नागपूर पोलीस गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केली आहे. ‘ओयो टाऊन हाऊस हॉटेल’ येथे देहव्यापार चालवला जातो, अशी टीप पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि बनावट ग्राहक पाठविला. ग्राहकाने रोशनशी मुलीचा सौदा केला. यानंतर त्याने इशारा दिल्यावर पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला आणि गड्डीगोदाम येथील ‘ओयो टाऊन हाऊस हॉटेल’ येथे कारवाई करत एका पीडित मुलीची सुटका केली. पोलिसांनी आपल्या कारवाईत सूत्रधार रोशन ऊर्फ सलमान राजेश डोंगरे (33, अंबाझरी हिल टॉप, पांढराबोडी) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Nagpur News, Sexual harassment

    पुढील बातम्या