नागपूर, 23 डिसेंबर : मनसेप्रमुख राज ठाकरे हे नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज मनसेच्या 275 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांची नियुक्ती दिली. यावेळी नव्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पदाधिकाऱ्यांसाठी मनसेकडं माणसं नसल्याची चर्चा सध्या विरोधकांमध्ये सुरू आहे, यावरून राज ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला आहे. विरोधकांना त्रास होणं स्वाभाविक आहे. मनसेची वाढ ही काही पक्षांच्या डोळ्यात खुपते, सुरुवातीला हासतात आणि नंतर लढायला येतात असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं
राज ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते मनसे पदनियुक्ती सोहळ्यात बोलत होते. मनसे पक्ष वाढत असल्याचा काहींना त्रास होतो. मनसेची वाढ ही काही पक्षांच्या डोळ्यात खुपते. विरोधकांना त्रास होणं स्वाभाविक आहे. सुरुवातीला विरोधक हासतात मग लढायला येतात. नव्या पदाधिकाऱ्यांकडून आपेक्षा आहेत, पराभवाने खचून जाऊ नका असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : 'प्रकरण दाबण्यासाठी उद्धव ठाकरेंचा पोलीस आयुक्तांना फोन'; उमेश कोल्हे हत्याप्रकरणात रवी राणांचा गंभीर आरोप
महापालिका निवडणुकीसाठी मनसेची रणनिती
मुंबईसह राज्यातील काही प्रमुख शहरांच्या महापालिका निवडणुका आगामी काळात होणार आहेत. यामध्ये नागपूर महापालिकेचा देखील समावेश आहे. महापालिका निवडणुकीसाठी मनसेनं तयारी सुरू केल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या तीन महिन्यांमधील राज ठाकरे यांचा हा दुसरा नागपूर दौरा आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज 275 पेक्षा अधिक जणांनी मनसेच्या पदाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MNS, Nagpur, Nagpur News, Raj Thackeray, Shiv sena