मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /MIM ची मविआला ऑफर; इम्तियाज जलिल यांच्या ऑफरवर देवेंद्र फडणवीस यांनी केलं मोठं वक्तव्य

MIM ची मविआला ऑफर; इम्तियाज जलिल यांच्या ऑफरवर देवेंद्र फडणवीस यांनी केलं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis: महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी करण्याच्या संदर्भातील ऑफर एमआयएमकडून देण्यात आली आहे. या ऑफरवर आता देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे.

Devendra Fadnavis: महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी करण्याच्या संदर्भातील ऑफर एमआयएमकडून देण्यात आली आहे. या ऑफरवर आता देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे.

Devendra Fadnavis: महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी करण्याच्या संदर्भातील ऑफर एमआयएमकडून देण्यात आली आहे. या ऑफरवर आता देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे.

नागपूर, 19 मार्च : राज्यात भाजपकडून महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) घेरण्याचा सातत्याने प्रयत्न होताना दिसत आहे. यासोबतच राज्यातील मविआ नेत्यांवर सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत. त्यातच नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने घवघवीत यश मिळवलं. त्यानंतर भाजपला रोखण्यासाठी एमआयएम (MIM)ने एक मोठी खेळी करत महाविकास आघाडीला एक ऑफर (MIM offer to Mahavikas Aghadi) दिली आहे. महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी करण्याचं विधान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल (MIM MP Imtiyaz Zaleel) यांनी केलं आहे. इम्तियाज जलील यांच्या या ऑफरनंतर राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आले आहे. त्यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजपला हरवण्यासाठी, पराभूत करण्यासाठी सर्वजण एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. पण कुणीही एकत्र आलं तरीही भारतातील जनता, महाराष्ट्रातील जनता ही मोदीजींच्या पाठिशी आहे आणि ती भाजपला निवडून देईल. आता या सर्व आघाडीत शिवसेना काय करणार याकडे आमचं लक्ष असणार आहे.

हरल्यावर विरोधकांना ईव्हीएम दिसतं, बी टीम दिसते, सी टीम दिसते. ते बोलत असतात त्याकडे फार लक्ष देण्याची आवश्यकता नाहीये असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

वाचा : मविआचे 25 आमदार संपर्कात, भाजप प्रवेशाचा मुहूर्तही ठरला, दानवेंचा मोठा दावा

आम्हाला पहायलं आहे की, आता सत्तेकरता शिवसेना काय करते. तसंही आता शिवसेनेने हिंदुह्रदयसम्राट ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकरलं आहे. अजानची स्पर्धा सुरू झाली आहे त्याचा परिणाम आहे का पाहू... असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

भाजपला पराभूत करण्यासाठी एमआयएमची मोठी खेळी!

भाजपला पराभूत करण्यासाठी सर्वपक्षांनी एकत्र येण्याची वेळ आली असल्याचंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. इम्तियाज जलिल यांनी म्हटलं, आमच्यावर आरोप होतात की, भाजप जिंकते ते आमच्यामुळे जिंकते. तर मी त्यांना ऑफर दिली की, जर तुम्हाला हे संपुष्टात आणायचं असेल तर तुम्ही आमच्यासोबत युती करायला तयार आहात का? पण त्यावर ते काही बोलले नाहीत. कुणालाही आम्ही नकोयत. फक्त मुस्लिमांची मते पाहिजेत. काँग्रेस, राष्ट्रवादीलाही मुस्लिम मते हवी आहेत ना या मग आमच्यासोबत.

या देशात सर्वात जास्त नुकसान जर कोण करत असेल तर ते भाजप आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी जे काही करावं लागेल त्यासाठी आम्ही तयार आहोत. उत्तरप्रदेशात सुद्धा समाजवादी पार्टी आणि बसपा सोबत बोलणं केलं होतं. पण त्यांना मतं हवी आहेत आणि ओवैसी साहेब नकोयत, एमआयएम पक्ष नकोय. म्हणून मी त्यांना ऑफर दिली की, चला आपण दोघेही एकत्र येऊन निवडणूक लढवूया असंही इम्तियाज जलिल म्हणाले.

First published:
top videos

    Tags: Devendra Fadnavis, MIM, Nagpur, Shiv sena