नागपूर, 1 डिसेंबर : राज्यात दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुर-मौदा महामार्गावर आज दुपारी भीषण अपघात झाला. या अपघातात तीन महिन्याच्या चिमुकलीसह तिच्या आईचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.
नागपूर मौदा महामार्गावर आज दुपारी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रेलरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार तीन महिन्याच्या चिमुकलीचा आणि तिच्या आईचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर वडील राजहंस वाघमारे आणि त्यांची आई अपघातात गंभीर जखमी झाले आहे.
मौदा येथील रबडीवाला चौकात अपघातानंतर काही काळ ट्रॅफिक जाम झाला होता. घटनेची माहिती मिळताच, मौदा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात दाखल केलं. तर आरोपी ड्रायव्हरला ताब्यात घेतलं आहे. पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
जळगावच्या नागदुली शिवारात ट्रॅक्टर पलटी झाल्याने तरूणाचा दबुन मृत्यू -
शेतातील मक्याचा चारा घेण्यासाठी ट्रॅक्टरने शेतात जात असतांना पाटचारीत ट्रॅक्टर पलटी झाल्याने 20 वर्षीय तरूणाचा दबुन दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना जळगाव जिल्ह्यातील नागदुली शिवारात घडली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश ज्ञानेश्वर सैंदाणे, असे मृत तरूणाचे नाव आहे. या अपघातात इतर 3 जण जखमी झाले आहे.
हेही वाचा - गाय शेतात घुसल्याचे कारण, जळगावच्या पाचोऱ्यात काकाने घेतला पुतण्याचा जीव
योगेश सैदाणे हा एरंडोल तालुक्यातील नागदुली येथे मामाच्या गावी कामानिमित्त आलेला होता. योगेश सैंदाणे हा नागदुली गावातील रविंद्र अभिमन कोळी यांच्या शेतातील मक्याचा चारा भरण्यासाठी उदेश गोविंदा कोळी, खुशाल राजू माळी यांच्यासोबत ट्रॅक्टरने सकाळी 10 वाजता जात होते. त्यावेळी ट्रॅक्टर रविंद्र कोळी चालवत होते.
सुकेश्वर मंदीराकडे जाणाऱ्या रस्त्यावर ट्रॅक्टर चालक रविंद्र कोळी यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर थेट पाटचारीत उलटे झाले. या अपघातात योगेश सैंदाणे हा ट्रॅक्टरच्या खाली दाबला गेला. त्याला तातडीने एरंडोल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Death, Nagpur News, Road accident