नागपूर, 14 डिसेंबर : राज्यातील विधान परिषदेच्या नागपूर (Nagpur MLC) आणि अकोला-वाशिम-बुलढाणा (Akola Washim Buldhana MLC) येथील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीची आज मतमोजणी (MLC election counting) होत आहे. विधान परिषदेच्या या दोन्ही जागांवर 10 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. तर आज मतमोजणी पार पडली आहे. राज्यातील एकूण सहा जागांसाठी ही निवडणूक होणार होती त्यापैकी चार जागांवर निवडणूक ही बिनविरोध झाली होती. नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलढाणा या दोन्ही जागांवर भाजप उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
MLC Election Live updates
अकोल्यात भाजपचे वसंत खंडेलवाल विजयी
अकोल्याची जागाही भाजपने जिंकली
चंद्रशेखर बावनकुळे 176 मतांनी विजयी, अधिकृत घोषणा बाकी
नागपुरात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विजयी
नागपुरात पहिल्या फेरीत भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आघाडीवर
नागपुरमध्ये काय स्थिती?
विधान परिषदेच्या नागपूर येथील जागेच्या निकालाकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत. कारण, या जागी मतमोजणीच्या अवघ्या काही तासांपूर्वी काँग्रेसने आपल्या उमेदवाराला सोडून अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. काँग्रेसने शेवटला क्षणाला आपले अधिकृत उमेदवार रवींद्र भोयर यांना बाजूला करून अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थन दिले त्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढली. या निवडणुकीत भाजपने चंद्रशेखर बाबनकुळे यांना उमेदवारी दिली होती.
नागपुरातील स्थिती
एकूण मतदार - 559
महानगरपालिका - 155 सदस्य
जिल्हा परिषद - 70 सदस्य
नगरपरिषद आणि नगरपंचायत - 334 सदस्य
वाचा : Kolhapur MLC Election: काँग्रेसचे सतेज पाटील बिनविरोध
नागपुरातील पक्षीय बलाबल
भाजप - 316
काँग्रेस 150
राष्ट्रवादी काँग्रेस - 24
शिवसेना - 28
बसपा - 12
शेकाप - 5
स्थानिक गट - 7
अपक्ष - 17
वाचा : Mumbai MLC Election: मुंबईची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध
अकोला-वाशिम-बुलढाण्यात काय स्थिती?
विधान परिषदेच्या अकोला-वाशिम-बुलढाणा जागेवर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे गोपिकिशन बजोरिया यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपकडून वसंत खंडेलवार यांना उमेदवारी देण्यात आली होती.
अकोला-वाशिम-बुलढाण्यातील पक्षीय बलाबल
एकूण मतदार - 822
भाजप - 254
काँग्रेस - 191
शिवसेना - 124
राष्ट्रवादी काँग्रेस 91
जिल्हानिहाय मतदार
अकोला - 287
वाशीम - 168
बुलढाणा - 367
अकोला जिल्हा
जिल्हा परिषद - 60 मतदार, महानगरपालिका- 81 मतदार, अकोट नगरपरिषद- 36, तेल्हारा नगरपरिषद- 19, बाळापूर नगरपरिषद- 26, पातूर नगरपरिषद- 19, मूर्तिजापूर नगरपरिषद- 26, बार्शीटाकळी नगरपंचायत- 20.
वाशिम जिल्हा
जिल्हा परिषद- 58, नगरपरिषद वाशिम- 34, नगर परिषद कारंजा- 32, नगर परिषद मंगरुळ्पीर- 21, नगरपरिषद रिसोड- 23.
बुलढाणा जिल्हा
जिल्हा परिषद बुलढाणा- 71, नगरपरिषद बुलढाणा- 31, नगर परिषद चिखली- 30, नगर परिषद देऊळगाव राजा- 21, नगर परिषद सिंदखेड- 19, नगर परिषद लोणार- 20, नगर परिषद मेहकर- 27, नगर परिषद खामगाव- 37, नगर परिषद शेगाव- 32, नगर परिषद जळगाव जामोद- 21, नगर परिषद नांदुरा- 26, नगर परिषद मलकापूर- 32.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akola, Buldhana news, Election, Nagpur, Washim