मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /MLC Election: निवडणुकीत काँग्रेस-भाजपचं साटंलोटं; नंदुरबारमध्ये भाजप तर कोल्हापुरात काँग्रेस बिनविरोध

MLC Election: निवडणुकीत काँग्रेस-भाजपचं साटंलोटं; नंदुरबारमध्ये भाजप तर कोल्हापुरात काँग्रेस बिनविरोध

Maharashtra MLC election: विधानपरिषद निवडणुकसाठी भाजप आणि काँग्रेस यांच्यात साटंलोटं झालं आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांसाठी एक-एक जागा सोडली आहे.

Maharashtra MLC election: विधानपरिषद निवडणुकसाठी भाजप आणि काँग्रेस यांच्यात साटंलोटं झालं आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांसाठी एक-एक जागा सोडली आहे.

Maharashtra MLC election: विधानपरिषद निवडणुकसाठी भाजप आणि काँग्रेस यांच्यात साटंलोटं झालं आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांसाठी एक-एक जागा सोडली आहे.

नागपूर, 26 नोव्हेंबर : विधानपरिषद निवडणुकीत (MLC Election) अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. कोल्हापूर विधानपरिषदेच्या जागेवर (Kolhapur MLC seat) भाजपने आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतला आहे तर नंदुरबार-धुळ्यातून (Dhule Nandurbar MLC seat) काँग्रेस उमेदवाराने माघार घेतली आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबार या दोन्ही जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून येणार आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, कोल्हापूर आणि नंदुरबार-धुळे या दोन जागा बिनविरोधात झाल्या आहेत. एक जागा काँग्रेसला आली आहे आणि एक जागा भाजपला गेली आहे. नंदुरबार-धुळ्याची जागा भाजपला तर कोल्हापूर विधानपरिषदेची जागा काँग्रेससाठी आली आहे. यासोबतच मुंबईतील दोन जागांपैकी एक जागा शिवसेना आणि दुसरी जागा भाजपला अशा एकूण चार जागांवर बिनविरोध निवडणूक होणार आहेत.

नागपूर विधानपरिषद निवडणूक होणार

नागपूरमध्ये लढत होणार आहे आणि या लढतीत काँग्रेसचाच विजय होईल. नागपूर विधानपरिषदेच्या निडणुकीत छोटू भोयर हेच विजयी होतील. नागपूरच्या जागेसंदर्भात भाजपकड़ून कुठलाही प्रत्ताव आला नाही त्यामुळे नागपूरच्या जागेसंदर्भात चर्चा झाली नाही असंही नाना पटोले म्हणाले.

वाचा : भाजप उमेदवार अमल महाडिकांकडून अर्ज मागे, काँग्रेसचे सतेज पाटील बिनविरोध

कोल्हापुरात सतेज पाटील बिनविरोध

कोल्हापुरात काँग्रेसने सतेज पाटील यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपने अमल महाडिक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. यामुळे ही लढत अटीतटीची होईल असं बोललं जात होतं. पण आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अमल महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे सतेज पाटील यांची निवड बिननिरोध होणार आहे.

धनंजय महाडिक यांनी सांगितले की, पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर अमल महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यासोबतच शौमिका महाडिक यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची बाळासाहेब थोरात यांच्यासोबत चर्चा झाली. या चर्चेनंतर दवेंद्र फडणवीस यांचा दुपारी दीड वाजता फोन आला आणि त्यानंतर आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेतला.

वाचा : मुंबईची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा

या दोन जागांसाठी कोल्हापूर सोडले

धनंजय महाडिक यांनी सांगितले की, धुळे- नंदुरबार आणि मुंबई या दोन जागांसाठी भाजपने कोल्हापूर विधान परिषदेची जागा सोडली आहे. या दोन जागांच्या बदल्यात कोल्हापुरची जागा सोडली.

First published:

Tags: Election, Nagpur