मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भारतामध्ये लम्पी व्हायरस कसा पसरला? नाना पटोलेंनी लावला नवा 'शोध'

भारतामध्ये लम्पी व्हायरस कसा पसरला? नाना पटोलेंनी लावला नवा 'शोध'

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकवेळा चर्चेत येतात, यावेळीही त्यांनी लम्पी व्हायरसवरून अजब दावा केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकवेळा चर्चेत येतात, यावेळीही त्यांनी लम्पी व्हायरसवरून अजब दावा केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकवेळा चर्चेत येतात, यावेळीही त्यांनी लम्पी व्हायरसवरून अजब दावा केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India
  • Published by:  Shreyas

नागपूर, 3 ऑक्टोबर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकवेळा चर्चेत येतात, यावेळीही त्यांनी लम्पी व्हायरसवरून अजब दावा केला आहे. नाना पटोले यांनी लम्पी रोगाचं खापर विदेशी चित्त्यांवर फोडलं आहे. इव्हेंटच्या माध्यमातून केंद्र सरकार विदेशी बिमाऱ्या आणत आहे. देशातील शेतकऱ्यांना संपवण्याचा हा डाव असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

'लम्पी हा आजार नायजेरियातून आला आहे, भारतात चित्तेही नायजेरियातून आले आहेत. चित्ते आणि गायींच्या अंगावरचे ठिपके सारखेच आहेत. सरकारने शेतकऱ्यांचं नुकसान करण्यासाठी मुद्दाम चित्ते भारतात आणले,' असं नाना पटोले म्हणाले. दरम्यान नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील नरभक्षक वाघाला तात्काळ मारण्याची मागणी केली. ज्याचा वाघ मारायला विरोध असेल त्याने वाघाला आपल्या घरी बांधून ठेवावे, असं टोला नाना पटोले यांनी मारला.

रेकॉर्ड ब्रेक! हजार नाही तर कोट्यवधीला विकली गेली मेंढी, तिचे वैशिष्ट्य जाणून तुम्ही व्हाल थक्क

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतात नामिबियाहून आठ चित्ते भारतात आणण्यात आले. मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये या चित्त्यांना सोडण्यात आलं आहे. 70 वर्षांआधी भारतातून चित्ते नामशेष झाले होते.

भारतात आलेले हे चित्ते इथल्या पर्यावरणाशी कसं जुळवून घेणार? हा प्रश्न उपस्थित होत असतानाच त्यांच्या सुरक्षेची पुरेपुर काळजी घेतली जात आहे. चित्त्यांना शिकारी व इतर वन्य प्राण्यांपासून वाचवण्यासाठी जर्मन शेफर्ड जातीच्या श्वानांना भारत-तिबेट सीमा पोलीस दलाच्या म्हणजेच आयटीबीपीच्या हरियाणातील पंचकुला इथल्या राष्ट्रीय श्वान प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षित केलं जातंय.

भारतात चित्ते आढळल्याची शेवटची नोंद 1948 मधली आहे. त्याच वर्षी कोरियाचे राजा रामनुज सिंहदेव यांनी तीन चित्त्यांची शिकार केली होती. त्यानंतर 1952 मध्ये भारतातून चित्ता नामशेष झाल्याचं घोषित केलं गेलं.

First published:

Tags: Nana Patole