मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : माणसांप्रमाणेच कुत्रे, मांजरींनाही हार्ट अटॅकचा धोका, 'ही' आहेत कारणे

Video : माणसांप्रमाणेच कुत्रे, मांजरींनाही हार्ट अटॅकचा धोका, 'ही' आहेत कारणे

हृदय विकाराचा झटका कधी कोणाला येईल सांगणे अवघड झाले आहे. मात्र, माणसांप्रमाणे पाळीव प्राण्यांमध्ये देखील या गंभीर आजाराची लागण होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हृदय विकाराचा झटका कधी कोणाला येईल सांगणे अवघड झाले आहे. मात्र, माणसांप्रमाणे पाळीव प्राण्यांमध्ये देखील या गंभीर आजाराची लागण होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हृदय विकाराचा झटका कधी कोणाला येईल सांगणे अवघड झाले आहे. मात्र, माणसांप्रमाणे पाळीव प्राण्यांमध्ये देखील या गंभीर आजाराची लागण होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 6 ऑक्टोबर : हृदय आपल्या शरीरातील एक महत्त्वपूर्ण अवयव आहे. जर हृदयच खराब झाले किंवा त्यात समस्या निर्माण झाल्या तर ही गोष्ट जिवावर बेतू शकते. गेल्या काही काळात हृदय विकाराच्या झटक्याने अनेक सेलिब्रिटी मृत्यूमुखी पडल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे हृदय विकाराचा झटका कधी कोणाला येईल सांगणे अवघड झाले आहे. मात्र, मानसांप्रमाणे पाळीव प्राण्यांमध्ये देखील काही गंभीर आजार आढळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

घरातील सदस्यांप्रमाणेच आपण घरातील पाळीव प्राण्यांना देखील जीव लावतो. आपल्या घरातील सदस्यांप्रमाणेच प्राण्यांच संगोपन, पालन, पोषण करतो. मात्र, अनवधानाने प्राण्यांच्या संगोपनातील लहानसहाण गोष्टी देखील प्राण्यांसाठी अपायकारक ठरू शकतात. त्यात गंभीर आजारांची लागण होऊन त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो. हे बोलण्यामागील कारण म्हणजेच माणसांप्रमाणेच पाळीव प्राण्यांना देखील हृदयाचे आजार, कॅन्सर, हार्टअटॅक येऊ शकतो.

संगोपनाची अयोग्य पद्धत धोक्याची

अगदी माणसांप्रमाणे पाळीव प्राण्यांत देखील किडनीचा आजार, हृदयाचे आजार, कॅन्सर, थायराईड आजार पाहायला मिळतात. मागील काही वर्षात कुत्रा, मांजर अशा पाळीव प्राण्यात सरासरी 10 रुग्णामध्ये 1 रुग्ण हा हृयरोगाचा आणि प्रत्येकी 3 रुग्णामागे 1 थायरॉईडचा रुग्ण आढळला आहे. आजारांमागील प्राथमिक कारण म्हणजे पाळीव प्राण्यांच्या संगोपनाची पद्धत, खाद्य, आणि हाताळणे असल्याची माहिती नागपूर पशू वैद्यकीय महाविद्यालयाचे साहाय्यक प्राध्यापक डॉ. गौतम भोजने यांनी दिली. 

या वयातील कुत्र्यांना कॅन्सरचा धोका 

पाळीव प्राण्यांमध्ये गेल्या काही वर्षांत कॅन्सर आजारांचे प्रमाण देखील वाढले आहे. कुत्री, मांजरी इत्यादी सारख्या पाळीव प्राण्यांमध्ये कॅन्सर सारख्या आजारावर पूर्णपणे मात करणे नेहमीच शक्य होत नाही. श्र्वानांमध्ये कॅन्सर हा आजार  सरासरी वयाच्या 8 ते 16 व्या वर्षांत होत असल्याचे आढळून आले. ज्याप्रमाणे कॅन्सर उपचारासाठी विविध प्रकारच्या थेरपी करण्यात येतात त्याच प्रमाणे पाळीव प्राण्यांच्या उपचारासाठी देखील थेरपी करण्यात येतात.

शहरात आल्यानं भेदरलेल्या गर्भवती नीलगायीचा दुर्दैवी मृत्यू, पाहा Video

इले्ट्रो थेरपीचा उपाय 

प्राण्यांच्या उपचारासाठी थेरपी करण्यात येते. त्यात प्रामुख्याने किमो थेरपी, इले्ट्रो थेरपीचा समावेश असतो. कॅन्सरमध्ये प्राण्यांच्या बाह्यभागावर गाठी होतात त्यांचा उपचार लेजरच्या साह्याने शस्त्रक्रिया करून करण्यात येतो, अशी माहिती पशू चिकित्सा संकुल पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्रमुख डॉ. संदीप आखरे यांनी दिली.

'ही' आहेत कारणे

आपल्याकडी कुत्र्यांच्या तुलनेत विदेशी कुत्र्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यांच्या जीनमध्ये डिफेक्ट असतो. विदेशा प्राण्यांवर येथील वातावरणाचा परिणाम जाणवतो. यामुळे आजार जडू शकतो. तसचे आजारांमागील प्राथमिक कारण म्हणजे पाळीव प्राण्यांच्या संगोपनाची पद्धत, खाद्य, आणि हाताळणे असल्याची माहिती नागपूर पशू वैद्यकीय महाविद्यालयाचे साहाय्यक प्राध्यापक डॉ. गौतम भोजने यांनी दिली. 

First published:

Tags: Lifestyle, Nagpur, Nagpur News