नागपूर, 05 जानेवारी: मागील काही दिवसांपासून मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात कडाक्याची थंडी (cold in maharashtra) पडली होती. यानंतर आता राज्यातील किमान तापमानात किंचितशी वाढ झाली असून राज्यात पावसासाठी पोषक हवामान निर्माण झालं आहे. उद्यापासून राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता (Rain in maharashtra) हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील चार दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असून अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याने (IMD) येलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे.
उद्या धुळे आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यात ढगाळ हवामानाची स्थिती राहणार असून पुढील चोवीस तासाच या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. 7 जानेवारीनंतर राज्यात हळुहळू पावसाचा जोर वाढणार आहे. शुक्रवारी (7 जानेवारी) नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळणार आहे. त्यानंतर 8 आणि 9 जानेवारीला मात्र उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळणार आहे.
हेही वाचा-Mumbai Coronavirus Alert: मुंबईत आज 15 हजार नवे कोरोना रुग्ण सापडण्याची शक्यता!
विकेंडला वाढणार पावसाचा जोर
8 जानेवारी रोजी हवामान खात्याने बुलडाणा, वर्धा, अकोला, नागपूर आणि अमरावती या पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. यासोबत ठाणे, पालघरसह उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात देखील अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत. तर रविवारी हवामान खात्याने वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या नऊ जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. संबंधित जिल्ह्यात विकेंडला विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
उत्तरेकडील वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम;राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता & काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस: 6 - 9 जानेवारी 6 धुळे,नंदुरबार 7 धुळे,नंदुरबार,जळगाव,नाशिक,अहमदनगर 8 ठाणे पालघर व उत्तर महाराष्ट्र,विदर्भातील काही भाग 9 मराठवाडा आणि विदर्भातील काही भाग - IMD pic.twitter.com/RS8FiSaxAC
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 5, 2022
खरंतर, सध्या उत्तर भारतात पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव निर्माण झाला आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. ऐन हिवाळ्यात पावसाची स्थिती निर्माण झाल्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंता वाढताना दिसत आहेत. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात विदर्भासह मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसासह गारपीट झाली आहे. गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. यानंतर आता पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट उभं ठाकलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weather forecast, महाराष्ट्र