मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Kabadi market: कपड्यांपासून ते मोबाईलपर्यंत सर्वकाही इथं स्वस्तात मिळतं, पाहा Video

Kabadi market: कपड्यांपासून ते मोबाईलपर्यंत सर्वकाही इथं स्वस्तात मिळतं, पाहा Video

X
नागपुरात

नागपुरात 'कबाडी बाजार' असून दर शनिवारी येथे मोठा बाजार भरतो.

नागपुरात 'कबाडी बाजार' असून दर शनिवारी येथे मोठा बाजार भरतो.

  • Local18
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 06 डिसेंबर : घरगुती वापरातील लहानात लहान वस्तू असो किंवा मोठ्यात मोठ्या गाडीचा एखादा पार्ट, किंवा अगदी फॅशनेबल कपडे, लोखंडी साहित्य, टायर, शोभेच्या वस्तू, भांडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल, लॅपटॉप इत्यादीपासून ते अँटीक, दुर्मीळ वस्तू पर्यंतचे साहित्य एकाच ठिकाणी मिळण्याच नागपुरात एक ठिकाण आहे. अगदी अल्प दरात याठिकाणी सर्व वस्तू मिळतात. नागपुरात 'कबाडी बाजार' हे ते ठिकाण असून दर शनिवारी येथे मोठा बाजार भरतो.

नागपुरातील कबाडी बाजार हा  १०० वर्षाहून जास्त काळापासून भरतो. या बाजारात नव्या आणि सेकंडहॅन्ड वापरण्यात सर्वच वस्तूंची खरेदीविक्री होते. या बाजाराचा लौकिक नागपूरसह विदर्भात आहे. या बाजारात एक हजाराहून अधिक दुकाने आहेत. सगळेच साहित्य एका ठिकाणी मिळत असल्याने दर शनिवारी मोठी गर्दी या बाजारात बघायला मिळते.

 अल्प दरात विक्री 

नागपुरातील एम्प्रेस मिलच्या रस्त्यावर दर शनिवारी हा बाजार भरतो. अनेकांच्या उपजीविकेसाठी या बाजाराचे महत्त्व अधिक आहे. बाजाराने अनेकांच्या पिढ्या देखील जागवल्या आहेत. गरज नसलेल्या आणि अडगळीत पडलेल्या वस्तू भंगारमध्ये विकल्या गेल्यानंतर त्या दुरुस्ती डागडुजी करून त्याची अल्प दरात परत विक्री केली जाते. आपल्या नको असलेली वस्तू कुणाच्या तरी उपयोगी ठरू शकते आणि त्यातून गरजुंना अल्प दरात वस्तू उपलब्ध होऊ शकते. या प्रमाणे येथील वेस्ट इज बेस्ट या पद्धतीने व्यवहार चक्र चालते. 

Satara : संक्रांतीला घरोघरी लागणारं सुगड कसं बनवतात? पाहा Video

नव्याजुन्या वस्तूंची खरेदी विक्री

अनेकांना अँटिक आणि दुर्मीळ वास्तूंचा छंद असतो तर काहींना कचऱ्यातून अप्रतिम कलाकृती घडवायची असते. हल्लीचे जग फार वेगाने पुढे जात आहे. मात्र, आपल्या इथे फार पूर्वी वापरल्या गेलेल्या वस्तूंना अँटीक म्हणून पुन्हा घरात स्थान प्राप्त झाले आहे. त्यामुळे अश्या वस्तूंना मोठी मागणी होत आहे. अनेकांच्या संग्रही पुरातन वास्तू असतात तर काहींना अश्या अडगळीत पडलेल्या वस्तू नको असतात ते अश्या वास्तूंची विक्री करतात.याशिवाय अनेक नव्या नव्या वस्तूंचे देखील विक्री या बाजारात केली जाते.

66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्कमध्ये रंगली शाहिरांची मैफील, Video

बाजाराचा वेळ आणि पत्ता

घरातील वापरात असलेल्या प्रत्येक वस्तूपासून गाडीचे टायर, भांडे, लोखंडी वस्तू, कपडे, गाडीचे पार्ट, इलेक्ट्रॉनिक वस्तू, लॅपटॉप, मोबाईल घडी, यासारख्या असंख्य वस्तू येथे मिळतात. अशी माहिती  35 वर्षापासून बाजारात अँटीक साहित्य विक्रेते मोहहमद परवेझ यांनी दिली. हा बाजार दर शनिवारी सकाळी 10 वाजल्या पासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एम्प्रेस मिल, गांधीनगर तलाव येथील मुख्य रस्त्यावर भरत असतो. आपल्या गरजेनुसार सर्व आवश्यक वस्तू या बाजारात उपलब्ध असतात.

First published:

Tags: Local18, Nagpur