Home /News /maharashtra /

नागपूर : वीरप्पनचा खात्मा करणाऱ्या IPS अधिकाऱ्यांची मुलगी विभागीय आयुक्तपदी

नागपूर : वीरप्पनचा खात्मा करणाऱ्या IPS अधिकाऱ्यांची मुलगी विभागीय आयुक्तपदी

विजयालक्ष्मी बिदारी यांना प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी याआधी आसाममध्ये गुवाहटीत सहायक आयुक्तम्हणून काम केले आहे.

    नागपूर, 6 ऑगस्ट : कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन याचा खात्मा प्रसिद्ध आयपीएस अधिकारी शंकर महादेव बिदारी यांनी केला होता. याच प्रसिद्ध आयपीएस अधिकारी शंकर महादेव बिदारी यांच्या कन्या विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदारी यांची नागपूरच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी बिदारी यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले. 2001च्या बॅचच्या अधिकारी - प्रसिद्ध आयपीएस अधिकारी शंकर महादेव बिदारी यांच्या कन्या विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदारी या 2001च्या बॅचच्या अधिकारी आहेत. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदारी आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे वडील शंकर महादेव बिदारी हे 1978च्या बॅचचे अधिकारी आहेत. विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदारी यांच्या आई या डॉक्टर आहेत. प्राजक्ता लवंगारे या केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेल्यानंतर डॉ. माधवी खोडे यांच्याकडे विभागीय आयुक्तपदाची जबाबदारी आली होती. मात्र, त्यादेखील सध्या प्रशिक्षणासाठी गेल्या आहेत. यामुळे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. हे प्रभारी म्हणून काम पाहत आहेत. दरम्यान, शुक्रवारी बिदारी यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. याठिकाणी केली आहे सेवा - विजयालक्ष्मी बिदारी यांना प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी याआधी आसाममध्ये गुवाहटीत सहायक आयुक्तम्हणून काम केले आहे. त्यानंतर सहायक आयुक्त, हिंगोली, सिंधुदुर्गच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव; महाराष्ट्र महिला विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक, कोल्हापूरच्या आयुक्त म्हणूनही सेवा बजावली आहे. हेही वाचा - माओवाद्यांचा मोठा घातपाताचा कट उधळला, पोलिसांची मोठी कारवाई इस्रोमध्ये जॉइंट डायरेक्टर - इतकेच नव्हे तर विजयालक्ष्मी या सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर होत्या. त्या इस्रोमध्ये जॉइंट डायरेक्टर पदावर कार्यरत होत्या. त्यांची प्रतिनियुक्ती सहा महिन्यांनी वाढवण्यात आली होती. आता परत त्यांना महाराष्ट्रात पाठवण्यात आले आहे. त्यांच्या आई उमादेवी या डॉक्टर आहेत आणि कुटुंबातील एकमेव नॉन-आयएएस आणि नॉन-आयपीएस व्यक्ती आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ias officer, IPS Officer, Nagpur News

    पुढील बातम्या