मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /भारतीय क्रिकेटर उमेश यादवच्या वडिलांचे निधन, दोनच दिवसांपूर्वी रुग्णालयातून आणलं होतं घरी

भारतीय क्रिकेटर उमेश यादवच्या वडिलांचे निधन, दोनच दिवसांपूर्वी रुग्णालयातून आणलं होतं घरी

umesh yadav fathar

umesh yadav fathar

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नागपूर, 23 फेब्रुवारी : भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याच्या वडिलांचे निधन झाले. उमेश यादवचे वडील तिलक यादव यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

गेल्या काही महिन्यांपासून उमेश यादवचे वडील आजारी होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचास सुरू होती. औषध उपचारांना प्रतिसाद देत नसल्याने अखेर डॉक्टरांनी उमेश यादवशी चर्चा केली होती. त्यानंतर उमेशने त्याच्या वडिलांना नागपूरमधील घरी आणलं होतं.

हेही वाचा : IND VS AUS : सेमी फायनल सामन्यात पाऊस पडल्यास कोणता संघ करणार फायनलमध्ये प्रवेश?

उमेश यादवचे वडील तिलक यादव हे वलनी कोळसा खाणीत काम करायचे. कुस्तीची आवड असलेले तिलक यादव हे उत्तर प्रदेशातल्या पडरौना इथून नोकरीच्या निमित्ताने नागपूरमध्ये आले होते. कोळसा खाणीत काम मिळाल्यानंतर त्यांनी नागपूरमध्येच वास्तव्य केलं.

तिलक यादव यांना उमेशने पोलिसात नोकरी करावी अशी इच्छा होती. वडिलांच्या इच्छेखातर उमेश यादवने लष्करासह पोलिसात भरतीसाठी प्रयत्न केले. मात्र त्याला यश आले नव्हते. टेनिस बॉल क्रिकेट खेळणाऱ्या उमेशला रणजी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर भारतीय संघातही त्यानं पदार्पण केलं. विदर्भाकडून कसोटी खेळणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला.

First published:
top videos

    Tags: Cricket