विशाल देवकर (प्रतिनिधी नागपुर) 8 जानेवारी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला कसोटी सामना हा नागपुरात खेळवला जाणार आहे. उद्या 9 फेब्रुवारी रोजी या मालिकेला सुरुवात होणार असून याकरता दोन्ही संघ नागपुरात दाखल झाले आहेत. असे असताना नुकताच विवाह बंधनात अडकलेला भारताचा स्टार क्रिकेटर के एल राहुल याने नागपुरातील साई मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
नागपूरातील वर्धा रोडवर असलेल्या साई मंदिरात के एल राहुलने मंगळवारी अचानक भेट देऊन साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी उपस्थितांना एक सुखद धक्काच बसला. यावेळी जवळपस अर्धा तास राहुलने मंदिरात वेळ घालवला. अनेकांनी त्याचा फोटो आपल्या मोबाईल मध्ये कैद करून समाज माध्यमांवर पोस्ट केला. सध्या काही व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे.
हे ही वाचा : कोणी देव तर कोणी गुरु, भारतीय क्रिकेटर्स यांच्या पुढे होतात नतमस्तक
अनेक भारतीय क्रिकेटर सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आध्यात्मिकतेकडे वळताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी विराट कोहलीने शर्मासोबत स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आश्रमाला भेट दिली होती.
कसोटी मालिकेपूर्वी, राहुलने नागपुरातील प्रसिद्ध साई बाबा मंदिराला भेट देऊन आशीर्वाद घेतले. केएल राहुल त्याच्या लग्नामुळे न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेत भारतीय संघाचा भाग नव्हता. परंतु लग्नानंतर तो पुन्हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेतून संघात पुनरागमन करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, India vs Australia, Kl rahul, Local18, Nagpur, Virat kohli