नागपूर, 1 एप्रिल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख मुख्यमंत्री असा केला. मात्र चूक लक्षात येताच त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणत आपली चूक सुधारल्याचं पहायला मिळालं. ते नागपुरात ई लायब्ररीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. माझ्या प्रभागात ई लायब्ररी बांधल्याबद्दल मी नगरसेवकांचे आभार मानतो. देशातील सगळ्यात चांगल्या ई लायब्ररीपैकी ही एक लायब्ररी असल्याचं यावेळी नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. लायब्ररीमध्ये दारू पिणाऱ्या माणसांना परवानगी मिळणार नाही, यांची काळजी घ्यावी अशी सूचनाही यावेळी गडकरींनी केली आहे.
नेमकं काय म्हटलं गडकरींनी?
माझ्या प्रभागात ई लायब्ररी बांधल्याबद्दल मी नगरसेवकांचे आभार मानतो. देशातील सगळ्यात चांगल्या ई लायब्ररीपैकी ही एक लायब्ररी आहे. मात्र आमच्या प्रभागात तिर्तंकर लोकांची संख्या मोठी आहे. दोन ग्लास घेतले आणि एसीची थंड हवा मिळते म्हणून ते इथे येऊन बसतील. त्यामुळे काळजी घ्यावी लागेल. लायब्ररीमध्ये दारू पिणाऱ्या माणसांना परवानगी मिळणार नाही याकडे विशेष लक्ष ठेवावे लागेल असं यावेळी नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत नागपूर शहराला 1500 कोटी रुपये दिल्याचंही यावेळी नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
नागपूरमध्ये 24 तास पाणी
पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, देशातील नागपूर हे पाहिलं शहर ठरणार आहे, जिथे नागरिकांना 24 तास पाणी मिळेल. मझं एक स्वप्न आहे की नागपुरातील अंबाझरी तलावातून बोटीत बसून गोसीखुर्दपर्यंत जाता येईल. हे काम कठीण आहे, पण नागरिकांनी मदत केली तर हे काम पूर्ण होईल. नागनदी स्वच्छतेसाठी काम करावे लागणार असल्याचंही गडकरी यांनी यावेळी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Devendra Fadnavis, Nagpur, Nitin gadkari