मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /रात्री दोघांनी हरभरा भाजून खाल्ला, सोबत जेवणही केलं, नंतर..., घटनेनं नागपूर हादरलं

रात्री दोघांनी हरभरा भाजून खाल्ला, सोबत जेवणही केलं, नंतर..., घटनेनं नागपूर हादरलं

मृत पती-पत्नी

मृत पती-पत्नी

दारूड्या पतीने पत्नीसोबत धक्कादायक कृत्य केले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 18 फेब्रुवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीची कुऱ्हाडीने हत्या करून पतीने आत्महत्या केली. या घटनेने नागपुरात खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

कुसुम मधुकर युवनाती (43) असे मृत पत्नीचे तर मधुकर धोबा युवनाती (53) असे मृत आरोपी पतीचे नाव आहे. मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या आरोपी पतीने कुऱ्हाडीने वार करून आपल्या पत्नीची हत्या केली. तसेच त्यानंतर त्याने त्याच खोलीत गळफास लावून घेत स्वत:ला संपविले. ही धक्कादायक घटना रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आमडी (ता. रामटेक) येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शुक्रवारी ही घटना उघडकीस आली.

चैतराम भालचंद बसोले (रा. आमडी, ता. रामटेक) हे मोठे दुग्ध व्यावसायिक आहेत. त्यांच्या मुलाचे रामटेक शहरात दुग्धजन्य पदार्थ विक्रीचे दुकान आहे. आरोपी मधुकर त्यांच्याकडे गुराखी म्हणून वर्षभरापासून काम करायचा. तसेच तो चैतराम बसोले यांच्या मालकीच्या एका छोट्या खोलीत एकटाच राहायचा. हे दोन्ही पती पत्नी मधप्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील सौंसर येथील रहिवासी होते. ते कामानिमित्त रामटेक तालुक्यात आले होते.

मधुकरची विवाहित मुलगी (कोथुळणा, ता. सावनेर) येथे राहते. तसेच त्याचा मुलगा याच गावात राहायला आल्याने मधुकरची पत्नी कुसुम मुलाकडे कोथळणा येथे राहायची. ती गुरुवारी आमडी येथे आली होती. रात्री जेवण झाल्यानंतर त्या दोघांमध्ये नेमके कोणत्या कारणावरून भांडण झाले याबाबत कुणालाही माहिती नाही. मधुकर शुक्रवारी सकाळी कामावर आला नसल्याने चैतराम त्याला बोलवायला आले असता बराच वेळ दार ठोठवला.

मात्र, यावेळी आतून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी दार तोडले. त्याचवेळी त्यांना कुसुम रक्ताच्या थारोळ्यात पडून तसेच मधुकर छताला लटकलेल्या आवस्थेत असल्याचे आढळून आले. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली.

हेही वाचा - लग्नाच्या 6 महिन्यातच पती-पत्नीमध्ये वाद, प्रकरण कोर्टात अन् घडलं भयानक

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणले. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अशित कांबळे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी रामटेक पाोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

आरोपीला दारुचे व्यसन -

मृत मधुकर युवनाती याला दारूचे व्यसन असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली. दोघांनी शुक्रवारी रात्री हरभरा भाजून खाल्ला व रात्री सोबत जेवण केले होते. त्यानंतरचा घटनाक्रम कुणालाही माहिती नाही. खोलीत रक्ताने माखलेली कुऱ्हाड आढळून आल्याने पोलिसांनी ती जप्त केली. त्याने आधी खून व नंतर आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.आरोपी पतीने आत्महत्या केल्याने हत्येचे कारण कळू शकले नाही. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Death, Murder news, Nagpur News