नागपूर, 1 फेब्रुवारी : भारताच्या इतिहासात अभिमानास्पद असणाऱ्या शिवराज्याभिषेक नामक क्रांतिकारी घटनेची साक्षीदार असलेली छत्रपतींची सुवर्ण होन नाणी आज जगाच्या पाठीवर अत्यंत दुर्मीळ आहेत. असेच होन नाणे चंद्रपूर येथील ज्येष्ठ नाणे संग्राहक आणि अभ्यासक अशोक सिंह ठाकूर यांच्या संग्रही आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे ही केवळ एक इतिहासातील घटना नव्हे तर भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावे असं क्रांतिकारी पर्व आहे. रयतेचं सार्वभौमत्व सुवर्ण सिंहासन श्रीमद रायगडावर स्थापन करून शिवाजी महाराजांच्या रूपाने मराठा राजा छत्रपती झाला. ही त्याकाळची असामान्य अशी घटना होती.
आजूबाजूला वापरात असलेल्या उर्दु- फारसी नाण्यांचे अनुकरण न करता, महाराजांनी आपला स्वभाषा विषयीचा अभिमान दाखवत शिवराज्याभिषेकाच्या वेळी देवनागरी लिपीत पाडलेली स्वतःची नाणी ही इतिहासातील त्याहून अधिक क्रांतिकारी घटना आहे.
6 जून 1674 पासून शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याचं स्वचलन सुरू केलं असावं, ज्याला आपणं शिवराई म्हणतो. तांब्याच्या शिवराई बरोबरचं महाराजांनी सोन्याचे होणं देखील सुरू केले. तद्वत त्यांनी मोगली वर्चस्वाला व पर्शियन भाषेच्या प्रभावाला झुगारून देवनागरी लिपीत पाडलेली स्वतःची नाणीही एक दूरगामी व क्रांतिकारी घटना होती.
नाण्यावर काय लिहिले होते?
बिंदुमय वर्तुळात एका बाजूला तीन ओळीत “श्री राजा शिव” व दुसऱ्या बाजूस दोन ओळीत “छत्रपती” असे महाराजांच्या नाण्याचे सर्वसाधारण स्वरूप होते. तांब्याच्या या शिवराई पैशाचे वजन साधारणतः १२ ते १४ ग्रॅम इतके असते. तसेच मोगलांप्रमाणे सोन्याच्या मोहोरा न पाडता विजयनगरच्या हिंदू साम्राज्याच्या धर्तीवर सोन्याचे २.७२८ ग्रॅम वजनाचे होन पाडले. त्यावरही शिवराई प्रमाणे बिंदुमय वर्तुळात एका बाजूला तीन ओळीत “श्री राजा शिव” व दुसऱ्या बाजूस दोन ओळीत “छत्रपती” असे लिहिलेले असे.
बॉम्बचा मारा, घातक मिसाईल, शत्रूवर तुटून पडणारे जवान, थरारक युद्ध सरावाचा Video
दुर्मीळ नाणी
शिवराज्याभिषेक वेळी शिवरायांच्या वजना इतकीच सुवर्णतुला करण्यात आली होती यामध्ये देखील अश्याचा नाण्यांचा समावेश होता व नंतर त्या दान स्वरूपात वितरित करण्यात आल्या. विशेषत: या नाण्यांना शिवरायांचा पदस्पर्श लाभला असावा म्हणून ही नाणी अतिशय पवित्र आणि पूजनीय आहे. मात्र काळाच्या ओघात या होन नाणे अतिशय दुर्मीळ असून मोजकेच नाणे उपलब्ध आहे. ज्यांच्याकडे ही नाणी असतील त्यांनी शिवप्रेमीसाठी प्रदर्शन करावे असे मत ज्येष्ठ नाणे संग्रहक व अभ्यासक अशोक सिंह ठाकूर यांनी व्यक्त केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.