मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

वर्ध्यात पैशाचा वाद विकोपाला, आधी नोकराला पाजली दारू मग असा काढला काटा

वर्ध्यात पैशाचा वाद विकोपाला, आधी नोकराला पाजली दारू मग असा काढला काटा

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

महेश मसराम उर्फ महेश मॅटर याचे बायपास रस्त्यावर असलेल्या कारला चौकात एस.एम. बिर्याणी नावाचे एक हॉटेल आहे. याच हॉटेलमध्ये मृत अमोल मसराम हा कामाला होता.

  • Published by:  News18 Desk
वर्धा, 16 ऑगस्ट : वर्धा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशाच्या वादातून हॉटेलमालकाने नोकराची हत्या केली आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. अमोल मसराम असे 32 वर्षीय मृताचे नाव आहे. तर महेश मसराम उर्फ महेश मॅटर, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - आरोपी महेश मसराम उर्फ महेश मॅटर याचे बायपास रस्त्यावर असलेल्या कारला चौकात एस.एम. बिर्याणी नावाचे एक हॉटेल आहे. याच हॉटेलमध्ये मृत अमोल मसराम हा कामाला होता. मात्र, दोघांमध्ये दोन ते तीन दिवसांपूर्वी पैशाच्या कारणातून वाद झाला होता. याच वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपी महेशने 15 ऑगस्ट रोजी अमोलला जीवे मारण्याचा कट रचला. रात्रीच्या सुमारास आरोपी महेश हॉटेलात गेला. तेथे त्याने दारु प्यायली. तसेच मृत अमोललाही दारु पाजली. त्यानंतर आरोपीने मृत अमोलला दुचाकीवर बसवून बायपास रस्त्याने पिपरी मेघे येथील जुना पाणी परिसरातून जाणाऱ्या उड्डणपुलावर नेले. याठिकाणी पुन्हा त्याने अमोलसोबत बाद केला. यानंतर त्याची चाकूने सपासप वार करुन हत्या केली. तसेच घटनास्थळावरुन पळ काढला. रात्रभर तिथेच पडलेला अमोलचा मृतदेह आज सकाळी स्थानिकांच्या निदर्शनास आला. यानंतर या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तेथील पाहणी केली. घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह सामान्य रुग्णालयात पाठवला. तसेच मृताच्या घरच्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली. हेही वाचा - पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीत बॉम्ब ठेवल्याने खळबळ! घटनेने राज्य हादरलं, CCTV फुटेज समोर आरोपी महेश मसराम उर्फ महेश मॅटर याने हॉटेलातीलच नोकराची हत्या केल्याचे उघडकीस आले. मृतकाला दुचाकीवर बसवून नेताना आरोपी महेशसोबत आणखी एक जण असल्याचा संशय रामनगर पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. तसेच ही दुचाकी आणि आरोपीचे रक्ताने माखलेले कपडेही पोलिसांनी जप्त केले आहेत, अशी माहिती आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
First published:

Tags: Crime news, Murder news, Wardha news

पुढील बातम्या