मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nagpur : नागपुरात हेल्मेट सक्ती! कारवाईला घाबरून खरेदी वाढली, पाहा Video

Nagpur : नागपुरात हेल्मेट सक्ती! कारवाईला घाबरून खरेदी वाढली, पाहा Video

हेल्मेट न घातलेल्यांवर कारवाई केली जात आहे. याचा हेल्मेट विक्रेत्यांना फायदा झाला असून हेल्मेटच्या विक्रीत तेजी आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 16 नोव्हेंबर : नागपुरातील  रस्त्यावर गाडी चालवताना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे.  मुख्य चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांचा फोटो टिपून ऑनलाईन चालान दिले जात आहे. तसेच अन्यत्र रस्त्यांवर हेल्मेट न घातलेल्यांवर देखील कारवाई केली जात आहे. याचा हेल्मेट विक्रेत्यांना फायदा झाला असून हेल्मेटच्या विक्रीत तेजी आली आहे.

नागपूर शहर ट्रॅफिक पोलिसांच्या माहितीनुसार, 1 जानेवारी ते 31 ऑक्टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीत सीसीटीव्ही कॅमेराद्वारे 2,46,584 तर डिव्हाइसद्वारे 2,28,730 दुचाकीस्वारांवर हेल्मेट न घातल्यामुळे कारवाई झाली आहे. या कारवाईचा परिणाम झाला असून दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालण्यास सुरुवात केली आहे. हेल्मेट विक्रीत देखील त्याचा परिणाम जाणवू लागला आहे.

 हेल्मेट विक्रीच्या चांगला व्यवसाय 

नागपुरातील आदिवासी गोवारी स्मारक जवळील फूटपाथवार स्वराज वाघमारे हेल्मेट विक्रीचा व्यवसाय करतात. मागील 15 वर्षापासून हा हेल्मेटचा व्यवसाय सुरू आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर दुचाकी आहेत. अनेक नागरिक फक्त पोलिसांच्या भीतीमुळे हेल्मेट घालतात. मात्र, हेल्मेट हे गाडीवर प्रवास करताना अतिशय महत्त्वाचे आहे. नागपुरात खड्डे आणि अपघात यांच्या समीकरण झाले आहे. त्यात हेल्मेट अपघातात जखमी होण्यापासून आणि मेंदूला मार लागून जीव जाण्यापासून वाचवू शकते. मागील काही महिन्यापासून हेल्मेट विक्रीच्या व्यवसाय चांगला चालत असल्याचे वाघमारे सांगतात. 

शहराचं सौंदर्य वाढवणाऱ्याला पालिका देणार बक्षीस, तुम्हालाही मिळू शकते संधी!

हेल्मेटमुळे संभाव्य धोका टाळता येतो

वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून रस्ते अपघात टाळता येऊ शकतात. देशात वर्षभरात लाखोंच्या संख्येने अपघात होत असतात त्यातील 80-90 टक्के प्रमाण हे मानवी चुका आणि वाहतूक नियमांची पायमल्ली झाल्यामुळे होतात. वाहतूक नियमांचे पालन हा आपल्या जीवनशैली एक भाग बनला पाहिजे. हेल्मेट नसल्याने बहुतांशी वेळा अपघातात मेंदूला मार लागून अनेकांचा जीव गेल्याच्या घटना घडतात. हेल्मेटमुळे डोक्याला व मेंदूला मार लागून जीव जाण्याचा संभाव्य धोका टाळता येऊ शकतो. त्यामुळे हेल्मेट हे केवळ पोलिसांच्या भीतीमुळे न घालता आपल्या सुरक्षिततेसाठी घालण्याचा सल्ला  रोड मार्क फाउंडेशनचे अध्यक्ष राजु वाघ यांनी दिला. 

First published:

Tags: Local18, Nagpur