मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नागपुरात अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा, पुढील दोन तासात या जिल्ह्यांत बरसणार सरी

नागपुरात अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा, पुढील दोन तासात या जिल्ह्यांत बरसणार सरी

Latest Weather Update: आज सकाळापासून नागपूरसह मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी ढगाळ हवामानाची (Cloudy weather) नोंद झाली आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज नागपुरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नागपूर, 11 जानेवारी: आज सकाळापासून नागपूरसह (nagpur) मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज नागपुरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी (Non seasonal rain) लावली आहे. तर तुरळक ठिकाणी गारपिटीचा (Hailstorm) तडाखा बसला आहे. येत्या काही तासांत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस धडकण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने आज विदर्भातील एकूण सात जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow alert) दिला आहे. तर लगतच्या मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने आज नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सात जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांतच याठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याच्या साथीने जोरदार पाऊस धडकण्याची शक्यता आहे. दरम्यान तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. याशिवाय आज औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड या आठ जिल्ह्यांत देखील तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहेत.

हेही वाचा-'या' ठिकाणी बार, रेस्टॉरंट बंद तर खासगी कार्यालयांना Work From Home चे आदेश

आजपासून पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणारा आहे. उद्या मराठवाड्यात कोणताही इशारा देण्यात आला नसला तरी, विदर्भात मात्र पावसाची स्थिती कायम राहणार आहे. उद्या नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सात जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. 14 जानेवारीपासून राज्यात पाऊस पूर्णपणे गायब होण्याची शक्यता आहे. तर येत्या दोन दिवसात तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-Third wave: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे 'या' उत्पादनांच्या साठ्यावर परिणाम!

दुसरीकडे, आज दुपारी नागपूर जिल्ह्यातील पारशिवानी, रामटेक आणि सावनेर तालुक्याला अवकाळी पावसासह गारपिटीने झोडपून काढलं आहे. गारपिटीने शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं असून संत्रा, मोसंबी, गहू आणि हरभरा पिकांना गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. यासोबतच वादळी वाऱ्याने काही भागात झाडे कोसळली आहेत. रामटेक जवळील दाहोदा आणि घोटी या गावात गारपीट झाली आहे. त्यामुळे गारांचा मोठा थर साचला होता.

First published:

Tags: Nagpur, Todays weather, महाराष्ट्र