मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : नागपूरच्या वाघोबाला भरली हुडहुडी, थंडीपासून बचावासाठी हिटरची ऊब!

Video : नागपूरच्या वाघोबाला भरली हुडहुडी, थंडीपासून बचावासाठी हिटरची ऊब!

पशुपक्षांना नैसर्गिक ऊब मिळावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. थंडीचा त्रास होऊ नये यासाठी हिटर लावण्यात आले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 17 नोव्हेंबर : गोड गुलाबी थंडीची चाहूल सर्वत्र जाणवू लागली असून तापमानामध्ये देखील कमालीची घट झाली आहे. नागपुरातील तापमान गेल्या दोन दिवसापासून 13°-15° सेल्सिअसपर्यंत घसरल्याने रात्रीच्या वेळी थंडी अधिक जाणवू लागली आहे. माणसाप्रमाणे मुक्या जनावरांना देखील थंडीची तीव्रता जाणवत असते. नागपुरातील  महाराज बागेतील प्राण्यांसाठी थंडीपासून संरक्षणासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.

 थंडीचा कडाका चांगलाच जाणवू लागला आहे. महाराज बागेतील प्राण्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. वातावरणातील आणि ऋतूमध्ये होणाऱ्या बदलाचा परिणाम प्राण्यांवर होतो. यामुळे प्रशासनाकडून उपाययोजना राबवून त्यांचे पालन पोषण करण्यात येत आहे. पशुपक्षांना नैसर्गिक ऊब मिळावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्राण्यांना थंडीचा त्रास होऊ नये यासाठी हिटर देखील लावण्यात आले आहेत.  

शहराचं सौंदर्य वाढवणाऱ्याला पालिका देणार बक्षीस, तुम्हालाही मिळू शकते संधी!

पिंजऱ्यात हिटरची व्यवस्था

रात्रीच्या वेळी गार वारा आणि थंडी लागू नये म्हणून पिंजऱ्याभोवती ग्रीन मॅट लावली आहे. तसेच नैसर्गिक अधिवासात उब मिळावी यासाठी वाळलेला पालापाचोळा, लाकडी फळी इत्यादी ठेवण्यात आले आहे. यासह छोट्या पिंजऱ्यात प्राण्यांना बसण्यासाठी लाकडी टेबल ठेवण्यात आलेले आहेत. बिबट्या, वाघ, अस्वल, यासह पक्षांच्या पिंजऱ्यात हिटरची सुद्धा व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती महाराज बागेचे प्रभारी अधिकारी डॉ. सुनील बावस्कर यांनी दिली. 

प्रेक्षणीय स्थळ

शहरातील एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून महाराज बागेकडे बघितलं जाते. येथे दिवसाला शेकडोंच्या संख्येने पर्यटकांची  रेलचेल असते. त्यातल्या त्यात बच्चा कंपनीसाठी अनेक खेळणी, जंगलात असणारे वाघ, चित्ता, अस्वल, सांबर, नीलगाय, मगर इत्यादीसह विविध पक्षी, मत्स्यालय यांच्याप्रती अधिक कुतूहल असतं. शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात असलेल्या जैवविविधता, पक्षी, वृक्ष यांच्याबद्दल सखोल माहिती व अभ्यासाच्या दृष्टीने अनेक शाळेच्या सहली देखील येथे येत असतात. 

First published:

Tags: Local18, Nagpur