मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Weather Forecast: येत्या 3 दिवसांत राज्यात गारपिटीसह मुसळधार पावसाची शक्यता; या जिल्ह्यांत हाय अलर्ट

Weather Forecast: येत्या 3 दिवसांत राज्यात गारपिटीसह मुसळधार पावसाची शक्यता; या जिल्ह्यांत हाय अलर्ट

Weather Forecast Today: उत्तर भारतात थंडीची लाट (Cold wave) ओसरल्यापासून राज्यात देखील किमान तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसची वाढ (temperature rise in maharashtra) झाली आहे.

  • Published by:  News18 Desk

नागपूर, 26 डिसेंबर: उत्तर भारतात थंडीची लाट (Cold wave) ओसरल्यापासून राज्यात देखील किमान तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसची वाढ (temperature rise in maharashtra) झाली आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा वाढला आहे. येत्या तीन दिवसात राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपिटीची (rain and hailstorm with lightning) शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 28 आणि 29 डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट (yellow alert) जारी केला आहे.

हवामान खात्याने मंगळवारी 28 डिसेंबर रोजी औरंगाबाद, जालना, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या सात जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यात मंगळवारी अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी कोसळणार आहेत. यासोबत तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त मंगळवारी धुळे, जळगाव, नाशिक, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत अंशत: ढगाळ हवामान राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-कोरोनामुळे भयंकर अवस्था; तरी Lung transplant शिवायच शौर्यने जिंकला आयुष्याचा लढा

तर बुधवारी देखील राज्यात कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे. बुधवारी हवामान खात्याने भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.

खरंतर, सध्या पूर्व अफगाणिस्तान आणि लगतच्या पाकिस्तानवर पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे राजस्थानातील हवेतील सिस्टिम मधून, द्रोणीय स्थिती विदर्भापर्यंत सक्रिय झाली आहे. त्याचा प्रभाव म्हणून 28 आणि 29 डिसेंबर रोजी राज्यात मराठवाडा, विदर्भात विजांच्या गडगडाटासह पाऊस, तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

First published:

Tags: Rain, Weather forecast, महाराष्ट्र