मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /वॉकी-टॉकीवर बोलताना ग्राऊंड स्टाफला विजेचा धक्का; दोघे जखमी, नागपूर विमानतळावरील घटना

वॉकी-टॉकीवर बोलताना ग्राऊंड स्टाफला विजेचा धक्का; दोघे जखमी, नागपूर विमानतळावरील घटना

इंडिगो फ्लाइट 6C7197 लखनौ-अहमदाबाद विमानात नागपूर विमानतळावर उभे होते.

इंडिगो फ्लाइट 6C7197 लखनौ-अहमदाबाद विमानात नागपूर विमानतळावर उभे होते.

इंडिगो फ्लाइट 6C7197 लखनौ-अहमदाबाद विमानात नागपूर विमानतळावर उभे होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 6 ऑगस्ट : नागपूरमधून एक ब्रेकिंग बातमी समोर आली आहे. इंडिगो फ्लाइट 6C7197 लखनौ-अहमदाबाद विमान नागपूर विमानतळावर उभे असताना, वॉकी-टॉकीवर बोलत असताना विजेचा धक्का लागल्याने विमानतळावरील दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.

काय आहे संपूर्ण बातमी -

इंडिगो फ्लाइट 6C7197 लखनौ-अहमदाबाद विमानात नागपूर विमानतळावर उभे होते. यादरम्यान, वॉकी-टॉकीवर बोलत असताना विजेचा धक्का लागल्याने विमानतळावरील दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. विमान लँडिंगच्या वेळी हे दोन्ही जण रनवेवर काम करत असल्याची माहिती आहे.

बिमलाईटवरही काही महिन्यांपूर्वी प्रशासनाचा आदेश -

दरम्यान, नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिवसरात्र वेगवेगळ्या एअरलाइन्स तसेच भारतीय वायुसेनेची विमाने आणि हेलिकॉप्टर उतरतात तसेच उडतात. त्यासाठी रात्रीच्या वेळी वैमानिकांना दिशा आणि धावपट्टी दाखवण्यासाठी रन-वे तसेच एटीसी टॉवरकडून संकेतासाठी विशिष्ट लाइट्सचा वापर करण्यात येतो. तसेच विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने अनेक आयोजक आकाशाच्या दिशेने बिम लाइटचा वापर करतात. बिम लाइटमुळे अनेकदा वैमानिकांचे डोळे दीपून दुर्घटना होण्याची शक्यता असते.

हेही वाचा - Flight Ticket: राडाच! फक्त 9 रूपयांत परदेश प्रवास, ‘या’ एअरलाइननं आणल्यात जबरदस्त ऑफर्स

तसेच नागपूर विमानतळ परिसरात आणि आजूबाजूच्या भागात अनेक वैमानिकांना बिम लाइटचा नकारात्मक अनुभव आला होता. त्यामुळे तो काही महिन्यांपूर्वी स्थानिक विमानतळ प्रशासनाच्या लक्षात आणून दिला होता. यानंतर विमानतळ प्रशासनाने पोलीस अधिकाऱ्यांकडे हा प्रकार सांगितल्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली होती तसेच उपाययोजना म्हणून सहपोलीस आयुक्त अस्वती दोरजे यांनी एक अधिसूचनाही जारी केली होती. यानंतर नागपूर विमानतळ आणि आजूबाजूच्या 15 किलोमीटर परिसरात सायंकाळी 6 ते सकाळी 6 या वेळेत बिमलाइट आकाशाच्या दिशेने सोडू नये, असे या आदेश देण्यात आला होता.

First published:
top videos

    Tags: Airport, Nagpur News