नागपूर, 24 जानेवारी : आकाशातील ग्रह ताऱ्यांविषयी आपल्याला कुतूहल असते. या ग्रह ताऱ्यांना पाहण्याची संधी नागपुरात उपलब्ध झाली आहे. आपल्यापासून लाखाे किलोमीटरवर फिरणारे गुरू, शुक्र, शनि बघायला मिळणार आहेत. नागपुरातील रमन विज्ञान केंद्रात यासाठी खास आयोजन करण्यात आले आहे.
वर्षभर अवकाशात विविध खगोलीय घटना घडत असतात. कधी धूमकेतू दर्शन देतो, कधी उल्का वर्षावाची पर्वणी बघायला मिळते, तर काही वेळा ग्रहणांच्या सावल्यांचा खेळ सुरू असतो. आकाशगंगेतील ह्या घटना म्हणजे सर्वांसाठी मोठे अप्रूप असले तरी अश्या काही घटना उघड्या डोळ्यांनी दिसण्या जोग्या नसतात. म्हणून नागपुरातील रमण विज्ञान केंद्र व तारामंडळच्या वतीने सध्या अशीच एक अनोखी पर्वणी खगोलप्रमींना आकाशात अनुभवायला मिळणार आहे.
अवकाशात गुरू, शुक्र, मंगळ व शनि हे चार ग्रह आपल्या पृथ्वीच्या जवळून परिक्रमा करीत आहेत. त्यामुळे शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी, अवकाश अभ्यासक आणि खगोल प्रेमीसाठी 24 ते 31 जानेवारीपर्यंत अवकाश निरीक्षण कार्यक्रम कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
रात्रीच्या आकाशात सतत बदलणाऱ्या आकर्षक घडामोडी घडतात. लुकलुकणारे तारे आणि नक्षत्रांपासून तेजस्वी ग्रहांपर्यंत, अनेकदा चंद्र आणि कधी कधी उल्कावर्षासारखे क्षणही येतात. आकाश पाहणाऱ्यांना गुरु, शुक्र, मंगळ, शनिची जवळून न्याहळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच यावेळी चंद्र त्याच्या सुंदर टप्प्याचे प्रदर्शन करेल क्षणोक्षणी घडणाऱ्या असंख्य घडामोडी जगभरातील खगोल अभ्यासक एकेक क्षण टिपत आहेत मग नागपूरकरांनी का मागे राहावे?
गृहिणींच्या वेदना कमी करण्यासाठी आली Eco friendly चूल, पाहा काय आहे संशोधन
एसओएस शो
रमण विज्ञान केंद्र व तारामंडळाच्या वतीने 24 ते 31 जानेवारीपर्यंत अवकाश निरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत अवकाशातील हे चार ग्रह आणि इतर घडामोडी पाहण्याची संधी उपलब्ध करण्यात येत आहे. शिवाय विशेष तारामंडळ आणि सायंकाळी 5 ते 5.30 वाजता दरम्यान एसओएस शो आयोजित करण्यात येणार आहे.
गुगल मॅपवरून साभार
स्किमिड केसग्रेन टेलिस्कोप
अवकाश निरीक्षणासाठी 11 इंचीच्या शक्तिशाली 'स्किमिड केसग्रेन टेलिस्कोप' सज्ज करण्यात आला आहे. या उपक्रम अंतर्गत पहिले पोचणाऱ्यांनाच प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून अवकाश प्रमी ॲडव्हान्स बुकिंग सुद्धा करू शकतात. खगोल प्रेमी आणि विशेषत: विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेत ग्रहांचे दर्शन करावे असे आवाहन रमण विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक अर्णव चॅटर्जी यांनी केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.