नागपूर, 03 डिसेंबर : नागपूरच्या सांस्कृतिक वातावरणात चैतन्य निर्माण करणाऱ्या मध्य भारतातील सर्वात मोठ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा प्रारंभ नागपुरात झाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या हा महोत्सव यंदाच्या विशाल अशा रंगमंचामुळे चर्चेत आहे. आजवरचा इतिहास पाहता शहरात इतका भव्य मंच यापूर्वी उभारण्यात आल्या नसल्याचा दावा खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीने केला आहे.
खासदार महोत्सवासाठी यावर्षी उभारण्यात आलेला स्टेज वैशिष्ट्यपूर्ण असा आहे. 25000 हजार चौरसफूट लांब, चार स्तर असलेला अकरा फूट उंच व्यासपीठ साकारण्यासाठी कारागिरांना एक महिन्याचा कालावधी लागला आहे. चारस्तरीय उंच मंचातील पहिला थर पाच फूट, दुसरा सात फूट, तर तिसरा नऊ आणि चौथा अकरा फूट असा आहे. दोन स्ट्रक्चरल इंजिनियरच्या मार्गदर्शनात सुमारे पाचशे कामगारांनी हा संपूर्ण डोलारा साकारला आहे.
25000 रसिकांसाठी बसण्याची व्यवस्था
भारतीय कला व संस्कृतीचा प्रचार-प्रसार व्हावा, विदर्भातील प्रतिभावंतांना मोठा मंच मिळावा, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांची कला नागपूरकरांना अनुभवता यावी, या हा महोत्सव मागील मुख्य उद्देश आहे. 25000 रसिकांसाठी बसण्याची व्यवस्था, तसेच बास्केटबॉल मैदानावर 2500 लोकांची अतिरिक्त आसन व्यवस्था करण्यात आली आहे. जवळपास 1000 लाइट्स, 350 माईक्स, 3500 स्क्वेअर फुटांचे एल.ए.डी. स्क्रीनस्, 3000 कलाकार असे भव्य आयोजन यंदा राहणार आहे.
भव्य मंच
नागपूर शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा मध्य भारतातील सर्वात भव्य अशा सांस्कृतिक महोत्सवामुळे नागपूरकरांना दरवर्षी नवनवीन कलाविष्कार अनुभवण्याची मोठी संधी मिळत असते. यंदा उभारण्यात आलेल्या भव्य व्यासपीठावर एकाच वेळी एक हजार ते बाराशे कलावंत सादरीकरण करू शकतात. हजार लोकांचा भार सांभाळण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी एच टाईप चे विशेष असे लोखंडी ब्लॉक लावण्यात आले आहेत. या लोखंडी ब्लॉगचे वजन जवळपास 50 टन असल्याचे समिती तर्फे सांगितले जात आहे.
Mahaparinirvan Din : सोलापूरातील भीम भक्तांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष व्यवस्था
1000 कलाकारांचा समावेश
विदर्भातील स्थानिक कलाकारांच्या कलेला वाव मिळावी आणि एक मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी ही एक पर्वणी आहे. यावेळी प्रथमच दररोज स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम होणार आहे. त्यात प्रामुख्याने 1000 कलाकारांचा समावेश असून ते नृत्य, नाट्य, गायन, वादन सादर करतील. त्याशिवाय सेवा वस्ती अर्थात झोपडपट्टी वस्तीतील राहणाऱ्या मुलांचे 'तारे जमीन पर' तसेच ट्रान्सजेंडरचे नृत्य होणार आहे. विशेषत्वाने 'तथागत' आणि 'पुण्यश्लोक अहिल्या' या दोन्ही महानाट्यांमध्ये 95 % कलाकार हे नागपूरचे आहेत. विदर्भातील कलाकारांच्या प्रस्तुतीचा आनंद रसिकांनी घ्यावा, असे आवाहन खासदार सांस्कृतिक महोत्सवात समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांनी केले आहे.
असे आहे वेळापत्रक
3 डिसेंबर - सेवावस्ती निवासी मुलांचे लघुनाट्य ‘तारे जमीं पर’ व सुप्रसिद्ध गझल गायक पद्मश्री हरिहरन यांची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’.
4 डिसेंबर - सकाळी 9.30 वाजता गीतापठन महायज्ञ तसेच, सायंकाळी ६.३० वाजता श्याम देशपांडे यांचा ‘जागर राष्ट्रभक्तीचा’ हा कार्यक्रम व अमित त्रिवेदी यांची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’
5 डिसेंबर - ट्रान्सजेंडर कलावंतांची नृत्य प्रस्तुती व अभिनेते मनोज जोशी यांचे ‘चाणक्य’ हा नाट्य प्रयोग
6 डिसेंबर - सुरमणी पं. प्रभाकर धाकडे गुरुंजीचे व्हायोलिन वादन व ‘तथागत’ हे महानाट्य.
7 डिसेंबर - श्याम देशपांडे यांचा ‘जागर राष्ट्रभक्तीचा’ हा कार्यक्रम व ‘पुण्यश्लोक अहिल्या’ हे महानाट्य
8 डिसेंबर - छत्तीसगढी पंथी नृत्य व मनोज मुंतशिर यांचा ‘माँ, माटी और मोहब्बत’ हा कार्यक्रम
9 डिसेंबर - बालकला अकादमी प्रस्तुत ‘तारे जमीं पर’ व प्रसिद्ध अभिनेते व कवी शैलेश लोढा व इतर कवींचे कविसंमेलन
10 डिसेंबर - सायली उजवणे व निलाक्षी खंडकर यांची शास्त्रीय व उपशास्त्रीय नृत्य प्रस्तुती व सुप्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती यांची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’
११ डिसेंबर - शिवमुद्रा ढोलताशा पथकाचा ‘शिवशाहीची रणधुमाळी हा कार्यक्रम व गायक मोहित चौहाण यांच्या लाईव्ह कॉन्सर्ट.
Video : पालकांनो, मुलांची काळजी घ्या! गोवर पाठोपाठ ‘या’ आजाराचा वाढलाय धोका
मिस कॉल द्या पासेस मिळवा
नागपूरकरांना या सांस्कृतिक महोत्सवाचा आस्वाद घेता यावा, या उद्देशाने यंदा ऑनलाईन माध्यमातून घरबसल्या पासेस मिळवता येणार आहेत. त्याकरिता नागरिकांनी 9158880522 या टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल द्यायचा आहे. याद्वारे पासेस प्राप्त करता येतील.
वाहन पार्किंग व्यवस्था
संताजी सभाग्रृह - टू व्हिलर/फोर व्हिलन पार्किंग
संत रविदास सभागृह - टू व्हिलर पार्किंग
ओसीडब्ल्यू ऑफिस - टू व्हिलर/फोर व्हिलन पार्किंग
प्रेरणा कॉलेज - टू व्हिलर पार्किंग
नागपूर सुधार प्रन्यास - व्हीआयपी पार्किंग
धन्वंतरी रुग्णालय - शासकीय व पोलीस कर्मचारी वाहन पार्किंग
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.