मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मध्य रेल्वेकडून खास गिफ्ट

गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मध्य रेल्वेकडून खास गिफ्ट

शेगाव येथील श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मध्य रेल्वेनं खास गिफ्ट दिलं आहे.

शेगाव येथील श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मध्य रेल्वेनं खास गिफ्ट दिलं आहे.

शेगाव येथील श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मध्य रेल्वेनं खास गिफ्ट दिलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

    विशाल देवकर, प्रतिनिधी

    नागपूर, 27 मार्च : विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो भाविक येतात. फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरातून भाविकांची इथं गर्दी असते. मंदिर प्रशासनाच्या वतीनं वर्षाला अनेक उत्सव आयोजित करण्यात येतात. त्यामधील रामनवमीचा उत्सव काही दिवसांवर आला आहे. रामजन्मोत्सवाच्या निमित्तानं श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मध्य रेल्वेनं खास भेट दिली आहे.

    मध्य रेल्वेचं गिफ्ट

    अकोला रेल्वे स्टेशनवरुन जाणाऱ्या नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अन्य तीन एक्स्प्रेसना प्रायोगित तत्त्वावर सहा महिने शेगाव इथं स्टॉप देण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे. हा प्रयोग सध्या तात्पुरता असला तरी प्रवाशांच्या प्रतिसादानुसार कायमस्वरूपी करण्याची शक्यता आहे.

    चैत्र नवरात्रीनिमित्त रेल्वेकडून खास भेट, डोंगरगडावर थांबणार 8 एक्स्प्रेस, पाहा वेळापत्रक

    31 मार्चपासून पुढील सहा महिने शेगाव रेल्वे स्टेशनवर या एक्स्प्रेस थांबतील.श्री संत गजानन महाराज संस्थान मध्ये श्री रामनवमी उत्सवास प्रारंभ झाला असून या उत्‍सवामध्ये  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रामनवमी उत्सवा दरम्यान राज्याच्या कानाकोपऱ्यातुन शेकडो दिंड्या शेगावात दाखल होत असतात. दरवर्षी भाविकांची होणारी प्रचंड गर्दी बघता मध्य रेल्वे प्रशासनाने  हा निर्णय घेण्यात आला आहे.

    वंदे भारत एक्स्प्रेस राज्यात सुपरहिट, महिनाभरातच प्रवासी संख्येचा विक्रम

    कोणत्या एक्स्प्रेस थांबणार?

    नागपूर- पुणे-नागपूर एक्स्प्रेस (22141/22142) ही ट्रेन येत्या 31 मार्चपासून शेगावला थांबणार आहे.  अमृतसर-नांदेड एक्स्प्रेसला 28 मार्चापासून, तर 12421 नांदेड-अमृतसर एक्स्प्रेसला 29 मार्च पासून शेगाव स्टेशनवर स्टॉप असेल. गाडी क्र. 12752 जम्मुतावी-नांदेड हमसफर एक्स्प्रेस 27 मार्चपासून ,तर गाडी क्र. 12751 नांदेड-जम्मुतावी हमसफर ही गाडी 31 मार्चपासून शेगाव स्टेशनवर थांबणार आहे.

    First published:
    top videos

      Tags: Indian railway, Local18, Nagpur