मुंबई : तुम्ही जर लग्नासाठी सोनं खरेदी करणार असाल तर सावधान. तुम्ही ज्या सराफाकडून सोनं खरेदी करता होलमार्क आहे की नाही ते नीट तपासून पाहा. याचं कारण म्हणजे बनावट हॉलमार्क केलेले दीड कोटीहून अधिक रकमेचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. भारतीय मानक ब्युरोने नागपूर शहर, पुणे, मुंबई, ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी छापे टाकून ही मोठी कारवाई केली.
तुम्ही जर दागिने खरेदी करत असाल तर तुम्ही होलमार्क तपासूनच करा नाहीतर तुमचीही फसवणूक होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार हे छापे एकाच वेळी टाकण्यात आले. मुंबईतील झवेरी बाजार परिसरात सोन्याच्या दागिन्यांवर बनावट हॉलमार्किंग करणाऱ्या दोन छोट्या संस्थांवर छापे टाकण्यात आले.
आठवड्याभरात कसे बदलले सोन्याचे भाव, 24 कॅरेटचे इथे चेक करा दर
मिळालेल्या माहितीनुसार एकूण 6 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. या छापेमारीत 1.5 कोटी रुपयांचे 2.75 किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलं आहे. बनावट हॉलमार्किंग रोखण्यासाठी मानक ब्युरोकडून सतत कारवाई केली जात आहे. त्यामुळे ग्राहकांना फसवण्याचं प्रमाण कमी होईल आणि अशा बनावट होलमार्किंग करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश होईल यासाठी ही कारवाई करण्यात आली.
सोनं खरेदी करताना ग्राहकांना शुद्ध सोनं मिळावं यासाठी हॉलमार्क पद्धत अवलंबवण्यात आली. मात्र या हॉलमार्कच्या नावाखालीच सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलं आहे.
मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या मुख्य शहरांसह महाराष्ट्रातील 6 ठिकाणी भारतीय मानक ब्युरोने एकाच वेळी छापे टाकले. BISप्रमाणे सुयोग्य चाचणी आणि गुणवत्ता तपासणी न करता, सोन्याच्या दागिन्यांवर बनावट हॉलमार्क लावून ग्राहकांची फसवणूक करणार्या कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्यात आलीय. सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलाकृतींवर 16 जून 2021 पासून बीआयएस हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.