मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Gold-Silver Rate Today in Nagpur: 14 दिवसांत दीड हजारानं वाढलं सोनं, आजचा दर पाहिलात का?

Gold-Silver Rate Today in Nagpur: 14 दिवसांत दीड हजारानं वाढलं सोनं, आजचा दर पाहिलात का?

सोन्याच्या दरात गेल्या 14 दिवसात तब्बल 1500 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीचा आजचा दर 64 हजार 700 रुपये प्रति किलो आहे.

सोन्याच्या दरात गेल्या 14 दिवसात तब्बल 1500 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीचा आजचा दर 64 हजार 700 रुपये प्रति किलो आहे.

सोन्याच्या दरात गेल्या 14 दिवसात तब्बल 1500 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीचा आजचा दर 64 हजार 700 रुपये प्रति किलो आहे.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Nagpur, India

  विशाल देवकर, प्रतिनिधी

  नागपूर, 14 मार्च : सध्या विवाहाचे मुहूर्त नसले तरी 29 एप्रिल पासून राज्यात लगीनघाई सुरू होणार आहे. त्यापूर्वीच सोन्या-चांदीचे दर वाढायला सुरुवात झाली आहे. गेल्या 14 दिवसांत सोन्याच्या दरात दीड हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोन्या-चांदीचे दर आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे रोज बदलत असतात. आज नागपूर सराफा बाजारातील आजचा सोन्याचा दर 58 हजार रुपये प्रती तोळा आहे. तर चांदीचा दर 64 हजार 700 रुपये प्रति किलो आहे.

  महाराष्ट्रीयन लोकांना दागिन्यांचे आकर्षण

  महाराष्ट्रातील लोकांना सोन्या-चांदीचे चांगलेच आकर्षण आहे. विशेषत: सण, उत्सव, घरगुती समारंभ यानिमित्त महिला वर्ग आवर्जून दागिन्यांची खरेदी करतो. तर गुंतवणुकीचा उत्तम मार्ग म्हणूनही सोने चांदीचा विचार केला जातो. त्यामुळे बदलणाऱ्या दरांवर सर्वांचेच लक्ष असते. मागील चौदा दिवसांचा विचार करता सोन्याच्या दरात प्रति दहा ग्राम 1,500 रुपयांनी वाढला आहे. काल सोमवारी 57 हजार 300 रुपयांवर असणारे सोने आज 58 हजारांवर गेले आहे.

  सोन्याच्या दरांत पुन्हा तेजी

  राज्यातील सराफा मार्केटमध्ये सोन्या-चांदीचे दर रोज बदलत असतात. विशेषता दिवाळीनंतर सोन्याच्या दरामध्ये वाढ झाली होती. 10 नोव्हेंबरला सोन्याचा दर 52 हजार रुपये होता. त्यानंतर महिनाभराच्या आत दोन हजारांहून अधिकने दर वाढला. 29 जानेवारीला सोन्याचा दर 57 हजार सहाशे रुपये होता. तर एक ते 28 फेब्रुवारी दरम्यान सोन्याच्या दरात जीएसटी वगळून प्रति दहा ग्राम 3 हजार 100, तर चांदीच्या दरात प्रति किलो 6 हजार 100 रुपयांची घट झाली होती. एक मार्चला सोने 56 हजार पाचशे रुपयांवर आले होते तिथून पुढे दरांमध्ये बऱ्यापैकी वाढ दिसून आली. मुख्य म्हणजे 1 मार्च ते 14 मार्च दरम्यान सोन्याच्या दरात 56 हजार 500 वरून 58 हजार रुपयांवर पोहोचला. 14 दिवसांत झालेली 1500 रुपयांची वाढ ग्राहकांची चिंता वाढवणारी ठरत आहे.

  Gold-Silver Rate Today in Pune : पुण्यात सोन्याच्या दरात आणखी वाढ! लगेच चेक करा आजची किंमत

  नागपूर सराफा बाजारात दागिन्यांच्या व्हरायटी

  आता नागपूरच्या बाजारपेठेत लाईट वेट ज्वेलरी, टिंपल ज्वेलरी तसेच कलर ज्वेलरीमध्ये, रोज गोल्ड, पिंक गोल्ड या दागिन्यांना विशेष मागणी आहे. कारण यामध्ये विविध प्रकार आले आहेत. तसेच महिलांचा आकर्षक आणि कमी वजनाचे दागिने परिधान करण्याकडे जास्त कल असतो. यामध्ये नवीन प्रकार आहेत आकर्षक आहेत. त्यामुळे जास्त मागणी सध्या या दागिन्यांना आहे.

  नागपूर शहरातील आजचा सोन्याचा दर

  नागपूर शहरातील सोन्याचे दर (10 ग्रॅम)

  10 ग्रॅम 24 कॅरेट - 58,000

  10 ग्रॅम 22 कॅरेट- 55,100

  10 ग्रॅम 20 कॅरेट- 51,900

  10 ग्रॅम 18 कॅरेट- 45,300

  नागपूर शहरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम)

  1 ग्रॅम 24 कॅरेट - 5,800

  1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,510

  10 ग्रॅम 20 कॅरेट- 5,190

  1 ग्रॅम 18 कॅरेट- 4,530

  चांदीचे दर

  प्रतिकिलो - 64,700

  नागपूर शहरातील कालचे सोन्या चांदीचे दर

  नागपूर शहरातील सोन्याचे दर (10 ग्रॅम)

  10 ग्रॅम 24 कॅरेट - 57,300

  10 ग्रॅम 22 कॅरेट- 54,300

  10 ग्रॅम 20 कॅरेट- 49,200

  10 ग्रॅम 18 कॅरेट- 46,400

  नागपूर शहरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम)

  1 ग्रॅम 24 कॅरेट - 5,730

  1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,430

  10 ग्रॅम 20 कॅरेट- 4,920

  1 ग्रॅम 18 कॅरेट- 4,640

  चांदीचे दर

  प्रतिकिलो - 65,000

  टीप : सोन्याच्या पेढ्यांमधील मजुरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या सारख्या वेगवेगळ्या कारणांनुसार सोन्याची किंमत प्रत्येक दुकानामध्ये वेगळी असू शकते. आम्ही शहरातील सर्वसाधरण भाव देत आहोत.

  First published:

  Tags: Gold and silver prices today, Gold prices today, Local18, Nagpur, Nagpur News