मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Gold-Silver Rate Today in Nagpur: नागपूरकरांना रामनवमीचा दिलासा नाही,पाहा कितीनं वाढले सोन्याचे दर

Gold-Silver Rate Today in Nagpur: नागपूरकरांना रामनवमीचा दिलासा नाही,पाहा कितीनं वाढले सोन्याचे दर

Gold-Silver Rate Today in Nagpur : नागपुरात सोन्या-चांदीची मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत दर काय आहेत जाणून घ्या.

Gold-Silver Rate Today in Nagpur : नागपुरात सोन्या-चांदीची मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत दर काय आहेत जाणून घ्या.

Gold-Silver Rate Today in Nagpur : नागपुरात सोन्या-चांदीची मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत दर काय आहेत जाणून घ्या.

  • Local18
  • Last Updated :
  • Nagpur, India

    विशाल देवकर, प्रतिनिधी

    नागपूर, 30 मार्च : भारतीय लोक सोने चांदीसारख्या मौल्यवान गोष्टींचे चाहते आहेत. त्यामुळे सण, उत्सव, समारंभ अशा मंगल प्रसंगी सोने चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. तसेच उत्तम गुंतवणूक म्हणूनही सोने चांदीचा विचार केला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने चांदीचे दर रोजच्या रोज बदलत असतात. नागपुरातीलसराफा बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात दररोज चढउतार होत असतात. आज रामनवमीच्या दिवशी सोन्याच्या दरात पुन्हा 100 रुपयांनी वाढ झाली आहे. आज नागपुरात 24 कॅरेट सोन्याचा दर 59 हजार 600 रुपये आहे.

    चांदीही महागली

    गेल्या काही काळत सोन्याच्या दरासोबतच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. चांदीही 70 हजारांच्या घरात टिकून आहे. काल चांदी प्रति किलो मध्ये तब्बल 700 रुपयांनी महाग झाली होती तर आज पुन्हा चांदीच्या दरात 200 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचा आजचा दर 70 हजार 900 रुपये प्रति किलोवर गेला आहे.

    नागपूर शहरातील आजचा सोन्याचा दर

    10 ग्रॅम 24 कॅरेट - 59,600

    10 ग्रॅम 22 कॅरेट- 56,600

    10 ग्रॅम 20 कॅरेट- 53,900

    10 ग्रॅम 18 कॅरेट- 47,700

    नागपूर शहरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम)

    1 ग्रॅम 24 कॅरेट - 5,960

    1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,660

    10 ग्रॅम 20 कॅरेट- 5,390

    1 ग्रॅम 18 कॅरेट-. 4,770

    चांदीचे दर

    प्रतिकिलो - 70,900

    नागपूर शहरातील कालचा सोन्याचा दर

    10 ग्रॅम 24 कॅरेट - 59,500

    10 ग्रॅम 22 कॅरेट- 56,500

    10 ग्रॅम 20 कॅरेट- 53,700

    10 ग्रॅम 18 कॅरेट- 47,600

    नागपूर शहरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम)

    1 ग्रॅम 24 कॅरेट - 5,950

    1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,650

    10 ग्रॅम 20 कॅरेट- 5,370

    1 ग्रॅम 18 कॅरेट-. 4,760

    चांदीचे दर

    प्रतिकिलो - 70,700

    Gold-Silver Rate today in Pune : रामनवमीला दागिना खरेदी करायचा आहे? लगेच चेक करा पुण्यातील दर

    हॉलमार्क असलेले दागिनेच ठरणार वैध

    सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्क असणे अनिवार्य करण्यात आले आहे. 1 एप्रिल 2023 पासून हॉलमार्क असलेले दागिनेच वैध ठरणार आहेत. हॉलमार्क हे अधिकृत चिन्ह असून ते धातूपासून बनवलेल्या वस्तूंवर मारले जाते. व्यापाऱ्यांनी शासनाने हॉलमार्क संबंधी दिलेल्या सूचनांचे पालक केले नाही तर कारवाई करण्यात येणार आहे.

    नागपूर सराफा बाजारात व्हरायटी

    नागपूरचा सराफा बाजार मोठा आहे. या ठिकाणी लाईट वेट ज्वेलरी, टिंपल ज्वेलरी तसेच कलर ज्वेलरीमध्ये, रोज गोल्ड, पिंक गोल्ड या दागिन्यांना विशेष मागणी आहे. कारण यामध्ये विविध प्रकार आले आहेत. तसेच महिलांचा आकर्षक आणि कमी वजनाचे दागिने परिधान करण्याकडे जास्त कल असतो.

    (टीप : सोन्याच्या पेढ्यांमधील मजुरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या सारख्या वेगवेगळ्या कारणांनुसार सोन्याची किंमत प्रत्येक दुकानामध्ये वेगळी असू शकते. आम्ही शहरातील सर्वसाधरण भाव देत आहोत.)

    First published:
    top videos

      Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today, Local18, Nagpur, Nagpur News